Wife Killed Husband: पॉर्न फिल्म बघून पत्नीचा लैगिंक छळ करणे पतीच्या जीवावर बेतले; पुणे येथील धक्कादायक घटना
ही घटना पुणे (Pune) जिल्ह्यातील देहूरोड (Dehu Road) येथील मामुर्डी (Mamurdi) गावात मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे.
पॉर्न फिल्म बघून पत्नीचा लैंगिक छळ करणाऱ्या पतीची पत्नीनेच हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना पुणे (Pune) जिल्ह्यातील देहूरोड (Dehu Road) येथील मामुर्डी (Mamurdi) गावात मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी पत्नीला अटक केली असून तिच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीला मद्यपान करण्याची सवय होती. एवढेव नव्हेतर दारू पिल्यानंतर पॉर्न फिल्म बघून पत्नीचा लैंगिक छळ करायचा. या त्रासाला वैतागून आरोपी महिलेने आत्महत्येदेखील प्रयत्न केला होता. मात्र, तरीदेखील त्याच्यात सुधारणा न झाल्याने अखेर तिने त्याला संपवायचा निर्णय घेतला. मृत हा मंगळवारी गाढ झोपेत असताना तिने त्याच्या गळ्यावर फावड्याने घाव करत त्याची हत्या केली आहे. या घटनेने संपूर्ण पुणे शहरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.
मयुर गायकवाड असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे. मयुरचा गेल्या अडीच वर्षांपूर्वी आरोपी महिलेसह आंतरजातीय प्रेमविवाह झाला होता. मयुर हा आपली आई, भाऊ आणि पत्नीसोबत देहूरोड येथील मामुर्डी येथे राहायचा. मयुरला दारूचे व्यसन असून तो पॉर्न फिल्म बघून आपल्या पत्नीचा लैंगिक छळ करत असे. दरम्यान, आपल्यासोबत लैंगिक छळ होत असल्याचे तिने दोन्ही कुटुंबियांना सांगितले होते. एवढेच नव्हेतर, या त्रासाला वैतागून तिने काही दिवसांपूर्वी आत्महत्येचादेखील प्रयत्न केला होता. मात्र, गेली अडीच वर्षे झाले हे सर्व सहन करत असताना, चार दिवसांपासून पतीचा त्रास संपावयचा अशी योजना तिने आखली होती. त्यानुसार पती एकटा कधी सापडणार? याची वाट पाहात होती. त्यानुसार मंगळवारी पहाटेच्या सुमारास सासू आणि दीर कामावर गेल्यानंतर गाढ झोपेत असलेल्या पतीच्या गळ्यावर फावड्याने घाव घालून तिने त्याची हत्या केली आहे. हे देखील वाचा- Corona Patient Dies By Suicide: थरारक! सांगली जिल्ह्यातील मिरज कोविड रुग्णालयात कोरोनाबाधिताची गळा कापून आत्महत्या
दरम्यान, समाजात महिलांवरील होणाऱ्या अन्याय व अत्याचाराच्या घटना अधिकच वाढू लागल्या आहेत. यातच पुणे येथील घटनेने आणखी भर घातली आहे. तसेच घरातदेखील महिला सुरक्षित नसल्याचे या घटनेतून उघड होत आहे.