Pune Weather Prediction, July 20 : IMD ने पुण्यासाठी आज यल्लो अलर्ट जारी केला आहे. पुण्यात आज मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. व पुण्यात घाट माथ्यावर आज मी मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.पुणे आणि साताऱ्याच्या डोंगराळ भागासाठी पुढील तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केले आहे.पुणे वेधशाळेने दक्षिण गुजरातपासून उत्तर केरळच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे येत्या तीन ते चार दिवसांत राज्याच्या बहुतांश भागात पावसाची शक्यता आहे.IMD-GFS च्या अंदाजानुसार, पुणे घाटात गेल्या २४ तासांत जोरदार पाऊस झाला. IMD पुणे घाट भागात 19-21 जुलै दरम्यानच्या IMD अंदाजानुसार मुसळधार ते अति मुसळधार पाऊस अपेक्षित आहे.पुणे शहरात 19 ते 21 जुलै दरम्यान हलका ते मध्यम पाऊस पडेल.रत्नागिरी काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची अपेक्षा आहे आहे. सातारा घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार तर मैदानी भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया: काही ठिकाणी अति मुसळधार आणि काही ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता आहे.
आता पुण्यात उद्याचे हवामान कसे असतील यासाठी हवामान खात्याने पुण्याचे उद्याचे हवामान अंदाज लावला आहे.हेही वाचा: Mumbai Weather Forecast For Tomorrow : मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!
पुण्यात उद्याचे हवामान कसे?
रत्नागिरी काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची अपेक्षा आहे. सातारा घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार तर मैदानी भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया काही ठिकाणी अति मुसळधार आणि काही ठिकाणी मुसळधार अतिवृष्टी व विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता आहे. दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजपत्रानुसार यंदा देशात सरासरीच्या 106 टक्के पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आहे. तसेच महाराष्ट्रातील बहुतांशी भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 'एल निनो' स्थिती सुरुवाती टप्प्यामध्ये तटस्थ राहू शकते. तर पावसाळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच जुलै किंवा ऑगस्टमध्ये 'ला निना' स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ला निना स्थिती देशातील यंदाच्या मॉन्सूनसाठी पोषक असल्याच्या नोंदी आहेत, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.