Pune Weather Forecast For Tomorrow : पुण्यात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!
हवामान खात्याच्या अंदाजनुसार पुण्यात आज दिवसभर ढगाळ वतावरणास हलका ते मध्यम सरींचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Pune Weather Prediction,July19 : भारतीय हवामान खात्याने आज (IMD) पुणे शहरासाठी ‘यलो’ अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याच्या अंदाजनुसार पुण्यात आज दिवसभर ढगाळ वतावरणास हलका ते मध्यम सरींचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. IMD-GFS च्या ताज्या अंदाजानुसार, पुणे घाटात (खंडाळा, लोणावळा, ताम्हिणी) 18 ते 20 जुलै दरम्यान खूप मुसळधार पाऊस अपेक्षित आहे.पुणे आणि साताऱ्याच्या डोंगराळ भागासाठी पुढील तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केले आहे.पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात पुढील ४८ तासांत मध्यम ते मुसळधार पावसाची अपेक्षा आहे, तर डोंगराळ भागात अति मुसळधार पाऊस पडेल. पुणे वेधशाळेने दक्षिण गुजरातपासून उत्तर केरळच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे येत्या तीन ते चार दिवसांत राज्याच्या बहुतांश भागात पावसाची शक्यता आहे. आता पुण्यात उद्याचे हवामान कसे असतील यासाठी हवामान खात्याने पुण्याचे उद्याचे हवामान अंदाज लावला आहे.हेही वाचा: Weather Forecast India: महाराष्ट्र, केरळ, हिमाचल प्रदेशसह भारतातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस; IMD चा हवामान अंदाज
पुण्यात उद्याचे हवामान कसे?
भारतीय हवामान खात्याने सांगितले की, मान्सून खाली सरकण्यास सुरुवात झाली आहे आणि या आठवड्यात केरळ, कर्नाटक आणि कोकण गोव्याच्या किनारपट्टीवर पोहोचेल. येत्या काही दिवसांत या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि गडगडाटी वादळाचा अंदाज आहे, असे IMD ने म्हटले आहे. IMD ने 17 जुलै 2024 रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये लक्षणीय पावसाची नोंद केली आहे. 17 जुलै 0830 ते 1730 HRS दरम्यानच्या आकडेवारीनुसार, मुंबईतील सांताक्रूझ आणि कुलाबा येथे अनुक्रमे 0.5 मिमी आणि 2.5 मिमी पाऊस पडला, तर इतर राज्यातील काही भागात जास्त पाऊस झाला. रायगडच्या माथेरान आणि पालघरच्या डहणूमध्ये अनुक्रमे 10.6 मिमी आणि 15 मिमी पाऊस पडला, तर रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस रत्नागिरी, दापोली आणि चिपळूण या ठिकाणी 11 मिमी ते 33.6 मिमी पावसाची नोंद झाली.