IPL Auction 2025 Live

Pune Weather Forecast For Tomorrow : पुण्यात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!

या कालावधीत शहरातील तापमान 21 अंश सेल्सिअस ते 24 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

Pune Weather Predictions, July 14 : हवामान खात्याच्या अंदाजनुसार,आजपासून ते 16 जुलै या कालावधीत पुणे घाटात अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.IMD पुणे हवामान विभागाचे माजी प्रमुख अनुपम कश्यपी यांनी पुढे इशारा दिला की सातारा आणि कोल्हापूर येथील घाट भागातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.अनुप कश्यपी पुढे बोले की पुणे शहरात आदीच ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पण पावसाचा जोर वडण्याची शक्यात आहे आणि त्यामुळे रेड अलर्ट जारी करण्यास भाग पढू शकतो त्यामुळे नागरिकाने सतर्कता बाळगावी .पुणे शहरात काही भागात मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर काही भागात एकाकी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे,कश्यपी यांनी नमूद केले.तत्पूर्वी, एका प्रसिद्धीमध्ये, IMD ने 15 ते 17 जुलै या कालावधीत घाट भागात ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. या कालावधीत शहरातील तापमान 21 अंश सेल्सिअस ते 24 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. आता पुण्यात उद्याचे हवामान कसे असतील यासाठी हवामान विभागने पुण्यात उद्याचे हवामान अंदाज लावला आहे.

पुण्यात  उद्याचे हवामान कसे? 

हवामान संस्थेने 12 जुलै रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि तेलंगणा येथे 16 जुलैपर्यंत "मुसळधार पावसाचा" अंदाज वर्तवला आहे. आंध्र प्रदेशात रविवारी आणि सोमवारी मुसळधार पाऊस पडण्याची अपेक्षा आहे.पूर्व आणि ईशान्य भारतातील हवामानाचा अंदाज लक्षात घेता, हवामान खात्याने आसाम, मेघालय आणि ओडिशामध्ये १६ जुलैपर्यंत ओले सरींचा अंदाज वर्तवला आहे. पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार आणि अरुणाचल प्रदेशात उद्यापर्यंत पाऊस पडेल. IMD च्या अंदाजानुसार, झारखंड राज्यात दिवसभर मुसळधार पाऊस पडेल. दुसरीकडे नागालँड आणि मणिपूरमध्ये उद्या आणि परवा मुसळधार पाऊस पडेल.