Pune Weather Forecast For Tomorrow: पुण्यात उद्याचे हवामान कसे असेल? जाणून घ्या हवामान अंदाज!
दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 24.12 °C आणि 29.62 °C दर्शवतो. पुण्यात आज वातावरण ढगाळ असेल व अधून-मधून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल.
Pune Weather Prediction, July 4: पुण्यात आज, 3 जुलै 2024 रोजी तापमान 27.94 डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 24.12 °C आणि 29.62 °C दर्शवतो. पुण्यात आज वातावरण ढगाळ असेल व अधून-मधून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. जसजसा जुलै येतो, तसतसे पुण्यात मान्सूनच्या सरींची अपेक्षा वाढत आहे, पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार आज नाशिक व पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे आज त्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहेत.पुणे व आजूबाजूच्या परिसरात चार ते पाच दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता आहे. 6 जुलै ते 10 जुलै 2024 या कालावधीत पुण्यात मान्सूनची तीव्रता वाडणार आहे. काही दिवसात पुण्यात पावसाच्या सरी वादतील व साततत्याने पाऊस पडेल असा अंदाज आहे.पुण्यातील धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा असूनही मंगळवारपर्यंत जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस - ९७.७ मिमीच्या तुलनेत १२२.२ मिमी झालाआहे. मात्र अल्पावधीतच झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमध्ये पाणी साचण्याऐवजी अधिकच वाहून गेले आहेत. आता पुण्यात उद्याचे वातावरण कसे असेल ह्यासाठी हवामान खात्याने पुण्याचे उद्याचे हवामान अंदाज लावले आहे. हेही वाचा: Mumbai Weather Forecast Today: मुंबई शहरात आज असं राहील वातावरण, वाचा हवामान अंदाज
यंदा देशभरात मान्सून नियोजित वेळेपूर्वीच सक्रिय झाला आहे. मात्र, त्यानंतरही अनेक राज्ये पावसासाठी आसुसलेली आहेत आणि अनेक राज्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. दरम्यान, हवामान खात्याने (IMD) अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यासोबतच येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयमध्ये ४ जूनपर्यंत, पश्चिम बंगाल, सिक्कीम, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये ५ जुलैपर्यंत सतर्कतेचा इशारा दिला आहे.