 
                                                                 Pune Weather Prediction, July 10: पुण्यात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसाचा इशारा देत हवामान खात्याने आज पुण्यात रेड अलर्ट जारी केला आहे. सोबतच आयएमडीच्या सतर्कतेनंतर आज पुण्यात शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांनी मंगळवारी कोणतीही अनुचित घटना आणि आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी 12वीपर्यंतच्या सर्व शाळा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. पुण्यात पुढच्या 24 तासात मुसळधार ते अती मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने लावला आहे. व घाट विभागात ही मुसळधार पाऊस होण्याची डाट शक्यात हवामान खात्याने वर्तवली आहे. नगरीकणा सतर्कते चा देखील इशारा देण्यात आला आहे. आतापुण्यात उद्याचे हवामान अंदाज कसे असतील ह्यासाठी हवामान खात्याने पुण्याचे उद्याचे हवामान अंदाज लावले आहेत. हेही वाचा: Mumbai Weather Forecast For Tomorrow : मुंबईत उद्याचे हवामान कसे ? जाणून घ्या हवामान अंदाज
पुण्यात उद्याचे हवामान कसे?
भारतीय हवामान खात्याने (IMD) कर्नाटक, गोवा अरुणाचल प्रदेश आणि महाराष्ट्रात दिवसभरात मुसळधार पावसाचा इशारा दिला आणि या राज्यांसाठी आज ९ जुलै रोजी रेड अलर्ट जारी केला. या व्यतिरिक्त आसाम आणि मेघालयमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने 12 जुलै रोजी पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये, पुढील तीन दिवसांत बिहारमध्ये आणि 11 जुलैपर्यंत अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयमध्ये अत्यंत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
