Pune Water Storage Update: पुणेकरांची चिंता वाढली, खडकवासला प्रकल्पात फक्त 31 टक्के पाणीसाठा

त्यामुळे पुणेकरांची चिंता वाढली असून अजून काही दिवस पाणीकपातीचा त्रास सहन करावा लागणार आहे.

Khadakwasala Dam

जुलै महिना अर्धा संपला तरीही पुणे जिल्ह्यात (Pune City) अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नाही.  यामुळे पुण्याला पाणीपुरवठा (Pune Water Strorage) करणाऱ्या धरणांमध्ये पाण्याचा साठा हा कमी शिल्लक राहिला आहे. पुण्यात खडकवासला धरणसाखळी (Khadakwasala Dam) प्रकल्पांतील चारही धरणांत गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी (Pune Rain) मारली आहे. त्यामुळे आतापर्यंत 31 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षी 17 जुलैंपर्यंत धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे 61 टक्के पाणीसाठा जमा झाला होता.  म्हमजेच गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाचा पाणीसाठा हा अर्धाच आहे. (हेही वाचा - Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात पुढचे चार ते पाच दिवस पाऊस वाढीचे- आयएमडी)

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये काहीच टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. त्यामुळे पुणेकरांची चिंता वाढली असून अजून काही दिवस पाणीकपातीचा त्रास सहन करावा लागणार आहे. या पु्र्वीच पुणेकर हे पाणी कपातीचा सामना करत असताना भविष्यात देखील त्यांना आणखी पाणीकपातीचा सामना करावा लागू शकतो.

पुण्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 8.62 टीएमसीने (28.58 टक्के) पाणीसाठा कमी आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांत जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्यामुळे धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा होईल,अशी अपेक्षा आहे. पुणे शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून प्रामुख्याने पाणीपुरवठा केला जातो.या चारही धरणांत मिळून सध्या 9.05 अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच 31.04 टक्के एवढा पाणीसाठा जमा झाला आहे.

 



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif