IPL Auction 2025 Live

Pune Water News: गुरुवारी पुण्यात पाणी कपात, अनेक ठिकाणी पाणीपुरवठा राहणार बंद

पुण्यातील मध्यवर्ती भागासह शहरातील इतर भागात संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Water Cut | Representational & Edited Image (Photo Credits: Pixabay)

जपुणे शहरात बहुतांश भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पुण्यातील मध्यवर्ती भागासह शहरातील इतर भागात संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. राहणार आहे.  (हेही वाचा -  Mumbai Water Supply Crisis: मुंबईकर पाणीटंचाईने त्रस्त! BMC ने दुरुस्ती करूनही वांद्रे, खार आणि सांताक्रूझमध्ये पाणीटंचाई कायम)

पुणे शहरातील सर्व पेठा, सहकारनगर, बिबवेवाडी, शिवाजीनगर, कोथरूड, वारजे, बाणेर भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. विद्युत, पंपिंग विषयक देखभाल आणि दुरुस्तीचे काम असल्याने महापालिका प्रशासनाने पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर शुक्रवार 23 ऑगस्ट रोजी कमी दाबाने पाणी येणार याची नोंद घ्यावी, अशी माहिती पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.

पर्वती MI.R टाकी परिसर:- गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टर गेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहियानगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडीम परिसर, घोरपडे पेठ, पर्वती दर्शन, मुकुंदनगर इ. पर्वती IILR टाकी परिसर सहकार नगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगरकाही भाग, महर्षीनगर,गंगाधाम, चितामणीनगर भाग-१ व २ लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आबेडकरनगर डायस प्लॉट, ढोले मळा, सॅलेसबरी पार्क, गरीधरभवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, भाग्योदयनगर, शिवनेरीनगर, मिठानगर, कुमार पृथ्वी, स.न.४२ कोंढवा खुर्द, साईबाबानगर, इत्यादी पर्वती LLR परिसर शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परीसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट परिसर पाणी पुरवठा बंद राहणार आहे.