मार्च 2020 पासून पुणे-सोलापूर दरम्यान धावणारी इंटरसिटी एक्सप्रेस दर शनिवारी रद्द; दुरूस्तीच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय
रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मार्च महिन्यात दर शनिवारी इंटरसिटी एक्सप्रेस धावणार नाही.
दौंड - सोलापूर रेल्वे मार्गावर दुरूस्ती सोबतच देखभालीचं तांत्रिक काम हाती घेण्यात येणार आहे. दरम्यान यामुळे पुणे - सोलापूर शहरादरम्यान धावणार्या इंटरसिटी एक्सप्रेसचं वेळापत्रक विस्कळीत होणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मार्च महिन्यात दर शनिवारी इंटरसिटी एक्सप्रेस धावणार नाही. यासोबतच दोन डेमू गाड्यानांही दर शनिवारी अंशतः रद्द करण्यात आला आहे.
इंटरसिटी एक्सप्रेस शनिवार वगळता इतर दिवशी नियमित धावणार आहे. सोलापूर - पुणे डेमू गाडी मार्च महिन्यात सोलापूर ते कुर्डूवाडी दरम्यान धावणार आहे. तर पुणे - सोलापूर दरम्यान धावणारी डेमू गाडी दर शनिवारी पुणे ते भिगवण स्थानकादरम्यान धावणार आहे. त्यामुळे भिगवण ते सोलापूर दरम्यान ही गाडी धावणार नाही. मात्र शनिवार वगळता इतर दिवशी या दोन्ही गाड्या सुरळित धावणार आहेत.
दरम्यान यंदा पावसाळ्यात दरडी कोसळल्याने मुंबई- पुणे रेल्वे मार्गावरील सेवादेखील काही दिवस विस्कळीत होती. रेल्वे रूळाच्या दुरूस्तीच्या कामासाठी मुंबई-पुणे दरम्यान धावणार्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या.