Pune Shocker: मुलगी नको म्हणून सुनेचा छळ करून गर्भपात, जास्त रक्तस्त्राव झाल्याने महिलेचा मृत्यू
ज्यात सोनोग्राफी करून मुलगी नको म्हणून सासरच्यांनी गर्भवती महिलेवर दबाव टाकून तिचा गर्भपात केला. ज्यामध्ये महिलेचा मृत्यू झाला. यानंतर नवजात अर्भकाला जमिनीत गाडण्यात आले. गर्भपात करताना जास्त रक्तस्त्राव झाल्याने महिलेला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर इंदापूरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
Pune Shocker: पुण्यातील इंदापूर तालुक्यातील एका गावात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ज्यात सोनोग्राफी करून मुलगी नको म्हणून सासरच्यांनी गर्भवती महिलेवर दबाव टाकून तिचा गर्भपात केला. ज्यामध्ये महिलेचा मृत्यू झाला. यानंतर नवजात अर्भकाला जमिनीत गाडण्यात आले. गर्भपात करताना जास्त रक्तस्त्राव झाल्याने महिलेला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर इंदापूरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर पोलिसांनी महिलेचा पती, सासू, सासरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यासोबतच पती आणि सासऱ्याला अटक करण्यात आली असून, सासूचा शोध सुरू आहे. हे देखील वाचा: Nalasopara Gang Rape: नालासोपारा मध्ये 22 वर्षीय तरूणीवर सामुहिक बलात्कार; तिन्ही आरोपी फरार
मिळालेल्या माहितीनुसार, इंदापूरच्या वडापुरी गावात राहणारी 23 वर्षीय ऋतुजा धोत्रे ही गर्भवती होती. त्यांच्या कुटुंबीयांना मुलगा पाहिजे होता. मात्र गर्भधारणेच्या उपचारादरम्यान त्यांना मुलगी असल्याचे कुटुंबीयांना समजले.