Pune Shocker: एक वर्षाच्या चिमुकल्याची उकळत्या पाण्यात बुडवून हत्या; आरोपीचे मुलाच्या आईसोबत अनैतिक संबंध
एफआयआरनुसार, आरोपींनी तक्रारदाराच्या बहिणीलाही जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
पुणे (Pune) जिल्ह्यातील खेड (Khed) येथील व्यक्तीने एका वर्षाच्या मुलाला उकळत्या पाण्याच्या बादलीत वारंवार बुडवून ठार मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे मुलाच्या आईसोबत अनैतिक संबंध होते. याप्रकरणी महिलेने रविवारी पहाटे चाकण पोलिस ठाण्यात (Chakan Police Station) एफआयआर (FIR) दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी विक्रम शरद कोळेकर वर गुन्हा दाखल केला आहे. एफआयआरनुसार, आरोपींनी तक्रारदाराच्या बहिणीलाही जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
रविवारी पोलिसांनी दिलेल्या माहितीमध्ये, आरोपीचे तक्रारदार महिलेसोबत प्रेमसंबंध होते. 6 एप्रिल दिवशी सकाळी, तो कथितरित्या खेड येथील महिलेच्या घरी गेला आणि तिच्या लहान मुलाला उचलून उकळत्या पाण्याच्या बादलीत बुडविले, परिणामी बाळाचे संपूर्ण शरीर गंभीर स्वरूपात भाजले. Girlfriend's Pressure In Extra-Marital Relationship: गर्लफ्रेंडची लग्नासाठीची अट पूर्ण करण्यासाठी बापानेच घेतला 2 वर्षीय मुलाचा जीव; प्लॅस्टिक बॅगेत भरून फेकला मृतदेह .
वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिनगारे यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये “आरोपीने सुरुवातीला फिर्यादीला सांगितले की, तिचे बाळ खेळत असताना बादलीत पडले. बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जेथे भाजल्याने त्याचा मृत्यू झाला. पण नंतर तक्रारदाराला संशय आला की तिच्या बाळाची हत्या आरोपीने केली आहे. तिने फिर्याद दिली असून तपास सुरू केला आहे. आरोपीला अजून अटक व्हायची आहे."
पोलिसांच्या माहितीनुसार तक्रारदार एक डान्सर म्हणून काम करते आणि तिच्या पतीपासून वेगळी राहते. आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम 302 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.