MHADA Pune Lottery 2019: खुशखबर! आज निघणार MHADA च्या 4,756 घरांची ऑनलाईन सोडत; lottery.mhada.gov.in येथे पाहा निकाल
आज पुण्यातील म्हाडाच्या (Pune Mhada Lottery) 4,756 घरांची सोडत निघणार आहे.
MHADA Pune Lottery Results 2019: आज पुण्यातील म्हाडाच्या (Pune Mhada Lottery) 4,756 घरांची सोडत निघणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून ही सोडत सुरु होईल. यंदा मार्चमध्ये पुण्यासाठी म्हाडाच्या घरांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यात एकूण 41, 501 इतके अर्ज प्राप्त झाले होते. त्यामुळे या 41, 501 अर्जदारांपैकी कोणाचे नशीब आज उघडणार हे लवकरच कळेल. म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, समरजितसिंह घाटगे आणि मिलिंद म्हैसकर यांच्या उपस्थितीत सकाळ 10 वाजता, अल्प बचत भवन येथे ही सोडत निघणार आहे.
म्हाडाच्या पुणे विभागात, सातारा जिल्हा सोडून अन्य जिल्ह्यात 4,756 घरे आहेत. 1 आरके, 1 बीएचके, 2 बीएचके आणि रो हाउस अशी ही घरे आहेत. समाजातील दुर्बल आणि गरजूंना परवडणाऱ्या दरात ही घरे उपलब्ध होणार आहेत. ज्या लोकांना ही घरे प्राप्त होतील त्यांना एसएमएस द्वारे कळवण्यात येणार आहे. सोडतीची प्रक्रिया आणि निकालाचे वेबकास्टिंग, केले जाणार असल्याने, घर बसल्या तुम्ही ते पाहू शकता. (हेही वाचा:
चार जिल्ह्यांमधील ही सोडत निघाल्यानंतर येत्या काही दिवसांत, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील 4,744 घरांसाठी सोडत काढली जाणार आहे. 4,756 घरांपैकी 1662 घरे प्रधानमंत्री आवास योजनेतील, 2237 घरे म्हाडाच्या गृहनिर्माण योजनेतील तर सरकारच्या 20 टक्के सर्व समावेशक योजनेसाठी 857 घरे आहेत. सोडतीची प्रक्रिया संपूर्ण मानवी हस्तक्षेपाशिवाय होणार आहे.
Live साठी येथे क्लिक करा
येथे ही पाहू शकता निकाल:
- वेबसाईट - www.mhada.maharashtra.gov.in
- www.mhada.gov.in
- http://lottery.mhada.gov.in
या सोडतीमध्ये घरे प्राप्त झालेल्या अर्जदारांनी कॅनरा बँकेमध्ये पात्रतेची कागदपत्रे 6 जुलै पर्यंत प्रत्यक्ष अपलोड करायची आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Jun 07, 2019 09:36 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

