Pune Metro Rail Recruitment: पुणे मेट्रो रेल प्रोजेक्ट मध्ये नोकरीची संधी; 15 मे पूर्वी असा करा अर्ज

मात्र यामधून SC, ST उमेदवार आणि महिला यांना मुभा देण्यात आली आहे.

Metro | (Photo Credits: Maha Metro)

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉरपरेशन लिमेटेड (Maharashtra Metro Rail Corporation LTD)  मधील पुणे मेट्रो प्रोजेक्टसाठी (Pune Metro Rail Project) काही अनुभवी कर्मचार्‍यांसाठी नोकरभरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये उपमहाव्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता, अकाऊंट असिस्टंट या पदांचा समावेश आहे. दरम्यान या भरतीप्रक्रियेत ऑफलाईन अर्ज दाखल करायला असून त्याची अंतिम मुदत 15 मे आहे. www.mahametro.org या संकेतस्थळावर अधिक माहिती आणि अर्जाचा नमूना देखील देण्यात आला आहे.

दरम्यान मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवाराची निवड केली जाणार आहे. तसेच संबंधित उमेदवाराला काही मेडिकल चाचण्यांमधून फिटनेस सर्टिफिकेट देखील सादर करावं लागणार आहे. SBI Recruitment 2021: एसबीआयमध्ये 92 फार्मासिस्ट आणि स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदासाठी नोकर भरती, अर्जप्रक्रियेबद्दल अधिक जाणून घ्या.

कोणकोणत्या पदावर नोकरभरती होणार?

#उपमहाव्यवस्थापक (Dy. General Manager - Finance E3)

रिक्त पदांची संख्या - 2

वयोमर्यादा - कमाल 45 वर्षे

#कनिष्ठ अभियंता (Jr.Engineer - Signal and Telecom S1)

रिक्त पदांची संख्या - 2

वयोमर्यादा - कमाल 32 वर्षे

#कनिष्ठ अभियंता (Jr.Engineer - Mechanical S1)

रिक्त पदांची संख्या - 2

वयोमर्यादा - कमाल 32 वर्षे

#अकाऊंट असिस्टंट (Account Assistance - Fin - NS4)

रिक्त पदांची संख्या - 5

वयोमर्यादा - कमाल 32 वर्षे

इथे पहा नोकरभरतीची सविस्तर जाहिरात.

.

अर्ज करण्यासाठी 400 रूपये शुल्क आकारला जाणार आहे. मात्र यामधून SC, ST उमेदवार आणि महिला यांना मुभा देण्यात आली आहे. अन्य इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून शुल्क भरावे लागणार आहे. हे शुल्क नॉन रिफंडेबल असणार आहे. अर्जासोबत ही रिसीट देखील दाखल करावी लागेल. निवड झाल्यानंतर महामेट्रोच्या नागपूर, पुणे किंवा अन्य प्रोजेक्टवर उमेदवारांना पाठवलं जाणार आहे.