Pune Crime: हरवलेली मांजर शोधण्याच्या बदल्यात महिलेकडे लैंगिक सुखाची मागणी; पुणे येथील धक्कादायक प्रकार

हरवलेली मांजर शोधण्यात मदत करण्याच्या बहाण्याने एका महिलेकडे लैंगिक संबंध ठेवण्याची मागणी केल्याबद्दल आणि अश्लील व्हिडिओ पाठवल्याबद्दल पुणे पोलिसांनी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Cat | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

हरवलेली मांजर (Missing ) शोधण्यासाठी मदत देण्याच्या बदल्यात 49 वर्षीय महिलेकडे शारीरिक सुखाची (Sexual Harassment) मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना पुणे शहरात घडली. या प्रकरणी चतुश्रुंगी पोलीस (Chatuhshrungi Police) स्टेशन दप्तरी अविनाश नामक व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, सदर घटना14 ऑक्टोबर रोजी सोमवारी रात्री 8:00 ते 11:00 दरम्यान ही घटना घडली. पीडितेच्या म्हणण्यानुसार, हरवलेल्या पाळीव प्राण्याचा शोध घेण्यासाठी मदत करण्याच्या नावाखाली संशयित आरोपी तिच्याकडे आला. तिचा विश्वास संपादन करून त्याने तिचा मोबाईल क्रमांक घेतला. परंतू, पुढे काहीच काळात त्याने फोनवर असभ्य भाषेत संवाद साधत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. ज्यामुळे पीडितेने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली.

बॉससोबत सेक्स करण्याची मागणी

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, अविनाश नामक व्यक्तीने तिला हरवलेली मांजर शोधण्यास मदत करण्याचे आश्वासन दिले. त्या कारणावरुन दोघांमध्ये फोनक्रमांकांची देवाणघेवाण झाली. दरम्यान, मांजर शोध राहिला बाजूलाच. पण त्याने असभ्य भाषा वापरत तिच्याशी संवाद साधण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे तर त्याने चक्क तिच्याकडे लैंगिक संबंध ठेवण्याविषयी विचारणाकेली. तो इतक्यावरच थांबला नाही. त्याने तिला चक्क आपल्या बॉससोबतरही सेक्स करणार का, असा व्हाट्सअॅप संदेश तिला पाठवला. महिलेने तीव्र नाराजी व्यक्त केली तरीही त्याने बॉसशी लैंगिक संबंध ठेवण्याची मागणी कायम ठेवली. त्याने काही अश्लिल आणि स्पष्ट व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप्स देखील व्हॉट्सअॅपद्वारे पाठवले. त्याने तिला तिच्यासाठी आपण मरणार किंवा मारणार अशी धमकीही दिली. (हेही वाचा, Cat And Kittens: जीव वाचताच मांजर पळाली, पण पिल्लांसाठी परत आली; मुंबईकरांनी पाहिले मातृप्रेम)

दरम्यान, अविनाश नामक आरोपीचा रागरंग लक्षात घेऊन पीडितेने चतुश्रुंगी पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपासही सुरु केला आहे.

पुणे शहरात लैंगिक छाळाची वाढती प्रकरणे

पुण्यात लैंगिक छळ  प्रकरणांमध्ये चिंताजनक वाढ होत असताना ही घटना घडली आहे. पुणे पोलिसांच्या आकडेवारीनुसार, गेल्या सात महिन्यांत शहरात बलात्काराच्या 265 आणि विनयभंगाच्या 450 घटना घडल्या असून, दरमहा सरासरी 38 बलात्कार आणि 65 विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत. एकट्या ऑगस्ट 2024 मध्ये, 37 बलात्काराच्या घटना आणि 60 विनयभंगाच्या घटना नोंदवल्या गेल्या, ज्यामुळे शहरातील महिलांच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली. पुणे हे उच्च-गुन्हेगारीचे शहर बनण्याच्या दिशेने संक्रमण करते आहे का, असा प्रश्न अनेक रहिवाशांना पडू लागला आहे.