Chicken in Paneer Biryani: पनीर बिर्याणीमध्ये आढळले चिकनचे तुकडे, धार्मिक भावना दुखावल्याची ग्राहकाकडून तक्रार; Zomato ची तत्काळ प्रतिक्रिया

पंकज शुक्ला असे ग्राहकाचे नाव आहे. त्यांच्याकडे आलेल्या जेवणाच्या पार्सलमध्ये चक्क चिकन आढळले. त्यामुळे आपल्या धार्मिक भावना दुखावल्याचा दावा शुक्ला यांनी केला आहे.

Chicken in Paneer Biryani | (Photo Credit - X)

Chicken in Paneer Biryani: झोमॅटो (Zomato) ग्राहकाने ऑनलाई ऑर्डर केलेल्या पनीर बिर्याणीमध्ये (Paneer Biryani) चक्क चिकन तुकडा आढळल्याचा दावा केला आहे. पंकज शुक्ला असे ग्राहकाचे नाव आहे. शुक्ला यांनी दावा केला आहे की, त्यांनी पुणे (Pune) शहरातील कर्वे नगर येथील पीके बिर्याणी हाऊस येथून झोमॅटो या फूड डिलिव्हरी ॲपद्वारे पनीर बिर्याणी ऑर्डर केली होती. मात्र, त्यांच्याकडे आलेल्या जेवणाच्या पार्सलमध्ये चक्क चिकन आढळले. त्यामुळे आपल्या धार्मिक भावना दुखावल्याचा दावा शुक्ला यांनी केला आहे.

धार्मिक भावना दुखावल्याचा ग्राहकाकडून दावा

पंकज शुक्ला यांनी त्यांना आलेल्या आनुभवाबद्दल सोशल मीडिया पोस्ट लिहीली आहे. तसेच, आपल्या एक्स पोस्टमध्ये त्यांनी जेवनाच्या थाळीची (ऑनलाईन पार्सल) छायाचित्रेही सामायिक केली आहेत. आपल्या पोस्टमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करत शुक्ला यांनी म्हटले आहे की,  पीके बिर्याणी हाऊस कर्वे नगर पुणे महाराष्ट्र येथून झोमॅटो अॅपद्वारे पनीर बिर्याणीची ऑर्डर दिली आणि मला त्यात चिकनचा तुकडा सापडला (मी शाकाहारी आहे). मला आधीच परतावा मिळाला आहे पण मी धार्मिक व्यक्ती असल्याने माझ्यासोबत असे घडणे हे पाप आहे असे मी मानतो. त्यामुळे माझ्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत." (हेही वाचा, Biryani in West Bengal: बिर्याणी खाल्ल्यास पुरुषांचे पौरुषत्व धोक्यात? बिर्याणी व्रिकेत्याचं शटर डाऊन)

व्हिडिओ

झोमॅटोकडून तत्काळ प्रतिसाद

शुक्ला यांनी आपल्यासोबत घडलेला प्रसंग आणि अनुभव सोशल मीडियावरुन कथन करताच झोमॅटोने त्याची तत्काळ दखल घेतली. आपल्या ग्राहकाला प्रतिसाद देताना झोमॅटोने ग्राहकांच्या भावनांचा आदर करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचे आश्वासन दिले. अधिकृत कस्टमर केअर खात्याने शुक्ला यांच्याशी संपर्क साधला आणि सखोल तपासासाठी अधिक तपशीलांची विनंती केली. झोमॅटोने प्रतिसादादाखल केलेल्या सोशल मीडया पोस्टमध्ये म्हटले आहे की, "हाय पंकज,

आमच्याकडून कोणाच्याही भावनांशी कधीही तडजोड होणार नाही याची खात्री करणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. कृपया तुमचा ऑर्डर आयडी किंवा नोंदणीकृत फोन नंबर DM द्वारे सामायिक करा जेणेकरून आपल्यासोबत नेमके काय घडले हे आम्ही तपासू शकू. (हेही वाचा, Cat Meat Used for Biryani in Chennai: धक्कादायक! बिर्याणीसाठी चक्क मांजरीच्या मांसाचा वापर?; व्हिडिओ व्हायरल होताच घटना उघडकीस)

एक्स पोस्ट

दरम्यान, झोमॅटोने प्रतिसाद देण्यापूर्वीच शुक्ला यांच्या एक्स पोस्टने सोशल मीडियात सर्वांचे लक्ष वेधले. त्यांनी सामायिक केलेली पोस्ट 17,000 पेक्षा जास्त लोकांनी पाहिल्याचे दिसून आले. तसेच, त्यांच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर आहारातील प्राधान्ये आणि धार्मिक संवेदनशीलता यांच्याभोवती वादविवाद सुरू केले. झोमॅटोचे सीईओ दीपंदर गोयल यांनी 100% शाकाहारी आहार प्राधान्य असलेल्या ग्राहकांसाठी 'प्युअर व्हेज मोड' आणि 'प्युअर व्हेज फ्लीट' लॉन्च करण्याची घोषणा नुकतीच केली होती. या घोषणेच्या काहीच काळात हा प्रकार घडला आहे. गोयल यांनी स्पष्ट केले की हे पाऊल कोणत्याही धार्मिक किंवा राजकीय गटाला दुर्लक्षित करण्याचा हेतू नाही, तरीही यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सर्वसमावेशकता आणि कथित पक्षपातीपणाबद्दल चर्चा सुरू झाली.