Most Traffic Congested City in The World: पुणे ठरलं जगातील सहाव्या क्रमांकाचे सर्वाधिक वाहतूक कोंडीचे शहर - रिपोर्ट

त्यामुळे शहरातील अनेक भागात वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवत आहे. पुण्यात 10 किलोमीटर अंतर कापण्यासाठी 27 मिनिटं लागत असल्याचं या अहवालात समोर आलं आहे.

Traffic प्रतिकात्मक छायाचित्र (Photo credits: PTI)

Most Traffic Congested City in The World: जागतिक वाहतूक कोंडीत पुणे (Pune) जगात सहाव्या क्रमांकावर असल्याचं एका सर्वेक्षणात समोर आलं आहे. टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स रँकिंग 2022 (TomTom Traffic Index Ranking) ने अलीकडेच जगातील 56 देशांमधील 389 शहरांमध्ये पुणे शहराला सहाव्या क्रमांकाचे सर्वाधिक गर्दीचे शहर (Pune Sixth Most Traffic Congested City in The World) म्हणून स्थान दिले आहे.

यात आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. कारण, वाढती लोकसंख्या, वाहनांची महागाई, अरुंद रस्ते आणि मेट्रोचे बांधकाम यामुळे पुण्याला हे बिरुद मिळवण्यात मोठा हातभार लागला आहे. टॉम टॉमच्या अहवालानुसार, भारतातील तीन शहरांत सर्वाधिक ट्रॅफिक असल्याचं समोर आलं आहे. यात बंगळुरू जगात दुसऱ्या क्रमांकावर, पुणे सहाव्या तर दिल्ली सतराव्या क्रमांकावर आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात वाहतूक कोंडी होण्याचं प्रमाण वाढलं आहे. पुणेकरांसाठी शहरातील वाहतूक कोंडी हा चिंतेचा प्रश्न ठरला आहे. (हेही वाचा -Mumbai Pune Sinhagad Express मध्ये प्रवाशांच्या वाढत्या मारहाणीच्या घटनांनतर आता अखेर 1 अतिरिक्त डब्बा जोडण्याचा निर्णय; 1 मे पासून अंमलबजावणी)

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात मेट्रोचं काम सुरू आहे. त्यामुळे शहरातील अनेक भागात वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवत आहे. पुण्यात 10 किलोमीटर अंतर कापण्यासाठी 27 मिनिटं लागत असल्याचं या अहवालात समोर आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात चारचाकी असणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

दरम्यान, टॉम टॉम अहवालानुसार, वाहतूक कोंडीच्या यादीत लंडन पहिल्या क्रमांकावर असून भारतातील आयटी हब बंगळुरू दुसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय दिल्ली 34 व्या क्रमांकावर आहे. तसेच या यादित पुणे शहर 6 व्या क्रमांकावर आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif