Pune: नदीत अडकलेल्या कारमधून कुटुंबातील 5 जणांची सुटका, लहानग्या भावासाठी बहिण व्याकूळ
घटनास्थळी जमलेल्या गर्दीवर पोलिसांनी नियंत्रण मिळवले तर अग्निशमन दलाने बचावकार्य केले.
पहाटेच्या मोहिमेत, पुणे (Pune) अग्निशमन दलाने शुक्रवारी एसएम जोशी पुलाखाली (S M Joshi Bridge) नदीत पडलेल्या कारमधून एका कुटुंबातील पाच जणांना (Rescued) वाचवले. अधिकाऱ्यांनी कुणाल लालवानी (28), प्रिया लालवानी (22), कपिल लालवानी (21), वंचिता लालवानी (13) आणि कृष्णा लालवानी (8) अशी कुटुंबातील सदस्यांची ओळख पटवली. गरवारे कॉलेजजवळील एसएम जोशी पुलाखाली नदीत एक कार तरंगताना दिसल्याचा फोन अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) नियंत्रण कक्षाला सकाळी 1.46 वाजता आला. अग्निशमन अधिकारी राजेश जगताप, चालक ज्ञानेश्वर खेडेकर, अग्निशमन दलाचे जवान किशोर बने, दिलीप घाडशी, संदिप कार्ले यांच्या पथकाने कारवाई केली.
अग्निशमन दलाच्या जवानांनी नदीत प्रवेश केला आणि दोरी, लाईफ जॅकेट आणि इतर उपकरणे वापरून कुटुंबातील सदस्यांची सुटका केली. हे कुटुंब मूळचे पालघर जिल्ह्यातील असून ते नातेवाईकांना भेटण्यासाठी पुण्याला गेले होते. रात्री उशिरा रजपूत विटभट्टीकडून कारमधून नदीपात्रातील रस्त्याने जात असताना पाण्याचा विसर्ग खूप मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यांची गाडी वाहून जात गरवारे पूलाखाली अडकली. घटनेची माहिती मिळताच पुणे शहर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी जमलेल्या गर्दीवर पोलिसांनी नियंत्रण मिळवले तर अग्निशमन दलाने बचावकार्य केले. (हे देखील वाचा: Pune: किरकोळ वादातून भोजनालयातील कर्मचाऱ्याची हत्या करुन पलायन, आरोपीस पालघरमध्ये अटक)
व्हिडिओ पहा
लहानग्या भावासाठी बहिण व्याकूळ
यावेळी रेस्क्यू करत असतांना जवानांनी 13 वर्षीय वऺचिका लाल वाणीला बाहेर आणले. त्यावेळी मोठमोठ्याने ओरडत आपला लहान भाऊ 8 वर्षीय कृष्णा लाल वाणीबद्दल ती विचारत होती. रक्षाबंधनाच्याच रात्री हा अपघात झाल्याने कुटुंबीय बिथरले होते. मात्र आपल्या लहान भावाला द्या असे म्हणत ती रडत होती. एकदाचे आपल्या भावाला सुखरुप पाहिल्यानंतर तिच्या जीवात जीव आला.