Speeding Car Plunges Off Garware Bridge: पुण्यातील डेक्कन परिसरात भरधाव कार गरवारे पुलावरून घसरली, चालक किरकोळ जखमी (Watch Video)

पुणे येथील डेक्कन परिसरात भरधाव वेगात आलेली कार गरवारे पुलाचा दुभाजक तोडून खाली कोसळली. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ ही घटना घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र चालकाला किरकोळ दुखापत झाली.

Speeding Car Plunges Off Garware Bridge: पुण्यातील डेक्कन परिसरात भरधाव कार गरवारे पुलावरून घसरली, चालक किरकोळ जखमी (Watch Video)
Garware Bridge Accident

पुणे येथील डेक्कन परिसरात भरधाव वेगात आलेली कार गरवारे पुलाचा दुभाजक तोडून खाली कोसळली. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ ही घटना घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र चालकाला किरकोळ दुखापत झाली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे 3 च्या सुमारास हा अपघात झाला. जंगली महाराज रोडवरून फर्ग्युसन कॉलेज रोडच्या दिशेने कार भरधाव वेगात असताना गरवारे पुलाजवळ चालकाचे नियंत्रण सुटले. कार दुभाजक तोडून थेट खाली पडली. रात्री उशिरा असल्याने खाली भुयारी मार्गात कोणीही उपस्थित नसल्याने जीवितहानी टळली. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरु आहे.

व्हिडिओ

(The above story first appeared on LatestLY on Jul 16, 2024 01:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).