पुणे कस्टम विभागातील अधिकाऱ्यांकडून चरस, गांजाची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक; तब्बल 1.79 कोटींचा माल जप्त

पुण्यात बुधवारी रात्री चरस आणि गांजाची तस्करी करणाऱ्या चौघांना कस्टम अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.

पुणे (Pune) कस्टम विभागातील अधिकाऱ्यांनी आमली पदार्थांची तस्करी करणाऱ्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. पुण्यात बुधवारी रात्री चरस आणि गांजाची तस्करी करणाऱ्या चौघांना कस्टम अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. तसेच अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून 868 किलो गांजा आणि 7.5 किलोचा चरस जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत 1.04 कोटी आहे. तर, चरसची किंमत 75 लाख इतकी आहे. सर्व आमली पदार्थ दोन वाहनांतून घेऊन जात होते, अशी माहिती एएनआय वृत्त संस्थेने दिली आहे. लॉकडाउन असतानाही काही भागात अत्यावश्यक नावाखाली आमली पदार्थांची तस्करी होत असल्याची अनेक घटना समोर आल्या आहेत.

पुण्यात दिवसेंदिवस तस्करीच्या घटना वाढू लागल्या आहेत. ज्यात वरील आणखी एका घटनेने भर घातली आहे. बुधवारी रात्री रंगे हात पकडले गेलेले चारही आरोपींना ताब्यात घेतले गेले आहे. तसेच याप्रकरणी त्यांची कसून चौकशी केली जात आहे. हे देखील वाचा- Pune Fire: कोंढवा परिसरात गॅरेजमध्ये लागलेल्या आगीत 10 गाड्या जळून खाक; जीवित हानी नाही

एएनआयचे ट्वीट-

पुण्यातील कस्टम विभागातील अधिकाऱ्यांनी याआधीही पुणे विमानतळावरून तब्बल 1 कोटी 29 लाख 4 हजार रुपायांचे सोने जप्त केले होते. दुबईवरून या सोन्याची तस्करी करण्यात आली असून स्पाइस जेट एयरवेज विमानाच्या वॉशरुममध्ये लपवण्यात आले होते. तस्करी करणाऱ्यांचा एक ग्रुप पोलिसांचा नजरेत आले होते. त्यानंतर कस्टम अधिकाऱ्यांनी संबंधित विमानाची कसून चौकशी केली होती. त्यावेळी अधिकाऱ्यांना विमानात सोने आढळून आले होते.