पुण्यात 25 वर्षीय Ajinkya Dahiya ने बनवलं Sanitary Napkins चं पर्यावरणपूरक, सुरक्षित विघटन करणारं मशीन

त्यानंटर मशीनमध्ये त्याचे पर्यावरण पूरक सेग्रिकेशन म्हणजेच विघटन करता येऊ शकतं आणि त्यामधील काही घटकांचा वापर रिसायकलिंग़ प्रोडक्ट्ससाठी केला जातो.

safe disposal of sanitary napkins Machine | Photo Credits: Twitter/ ANI

पुण्यामध्ये 25 वर्षीय अजिंक्य दाहिया या मुलाने सॅनिटरी नॅपकिन्सचं सुरक्षित विघटन करता यावं म्हणून खास मशीन तयार केले आहे. अजिंक्य हा नुकताच इंजिनियरिंग क्षेत्रातील पदवीधर आहे. त्याने स्वतःचं स्टार्टअप सुरू करून Padcare हे मशीन बनवलं आहे. या मशीनच्या माध्यमातून त्याने सॅनिटरी नॅपकिन्सचं सेफ डिसपोसल करण्यास मदत होईल असा दावा केला आहे.

पॅडकेअर लॅब मशिन हे वापरलेल्या सॅनिटरी पॅड्समधील प्लॅस्टिक आणि cellulose drain वेगळं करण्यास मदत करतं. त्यानंतर त्याचं रिसायाकलिंग देखील होऊ शकतं. 2018 साली अजिंक्यला ही कल्पना सुचली आणि आता तो शहरात अनेक कंपन्यांना हे सेफ डिसपोझल ऑफ सॅनिटरी नॅपकीन मशीन पोहचवतो.

अजिंक्य ने ANI ला दिलेल्या माहितीनुसार, त्याने बनवलेली डसबिन्स ही शौचालयामध्ये सहज लावली जाऊ शकतात. त्यामध्ये वापरलेली सॅनिटरी नॅपकिन्स 45 दिवसांसाठी सहज साठवली जाऊ जातात. या खास बनवलेल्या डसबीनला "Sanibins" असं नाव आहे. यामध्ये वापरलेली नॅपकिन्स ही 30 ते 45 दिवस राहतात. दरम्यान ती डिसइंफेक्ट केली जातात म्हणजे त्यामधून कोणताही दुर्गंध येत नाही.

महिन्या- दोन महिन्यांनी जमा केलेली सॅनिटरी पॅड्स नंतर पॅडकेअर मशीन मध्ये टाकली जातात. त्यानंटर मशीनमध्ये त्याचे पर्यावरण पूरक सेग्रिकेशन म्हणजेच विघटन करता येऊ शकतं आणि त्यामधील काही घटकांचा वापर रिसायकलिंग़ प्रोडक्ट्ससाठी केला जातो.

अजिंक्य आणि त्याच्या टीम कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 12 बिलियन सॅनिटरी नॅपकिन्स ही भारतात दरवर्षी असतात. त्यामध्ये 98% नॅपकिन्स ही लॅन्डफिल्स किंवा पाण्यात जातात, जी पर्यावरणामध्ये प्रदूषण निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात.

वापरलेल्या सॅनिटरी नॅपकिन्स मधून रिसायकल मटेरियल हे घरातील काही शोभेच्या वस्तू बनवण्यासाठी वापरलं जाऊ शकतं. आता तरूण मंडळी पर्यावरणपुरक सॅनिटरी नॅपकिन्स बनवत आहेत त्यामुळेच आता पर्यावरणाला धोका कमी करण्यासाठी त्याचा वापर करण अधिक सोयीचं आहे.