Pune Accident: भरधाव टेम्पोने चिमुकल्याला चिरडले, आई गंभीर जखमी; बिबवेवाडीमध्ये भीषण अपघात
पुण्यातील बिबवेवाडीमध्ये भरधाव टेम्पोच्या धडकेत एका चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. या अपघातात चिमुकल्याची आई गंभीर जखमी झाली आहे. सध्या पोलिसांकडून टेम्पोचालकाचा शोध सुरू आहे.
Pune Accident: पुण्यातील बिबवेवाडी येथे भरधाव टेम्पोने चिमुकल्याला चिरडल्याची घटना (Pune Accident) घडली आहे. यामध्ये चिमुकल्याची आई देखील गंभीर जखमी झाली आहे. बिबवेवाडीमधील उताराच्या रस्त्यावर एकाकडेला चिमुकला त्याच्या आईसोबत जात होता. इतक्यात हा भरधाव टेम्पो आला अन् त्याने चिमुकल्याला धडक(tempo hit child) दिली. या धडकेमुळे चिमुकला थेट टेम्पोच्या चाकाखाली आला. काल रविवारी ७ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अप्पर येथे ही घटना घडली. या अपघातानंतर परिसरामध्ये काही काळ गोंधळ उडाला होता. (हेही वाचा :Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू )
रुद्र शिंदे (वय 4 वर्षे) असं मृत चिमुकल्याचं नाव आहे. तर, रुपाली शिंदे (वय 28 रा. शिवतेज नगर, बिबवेवाडी) असं अपघातात जखमी झालेल्या महिलेचं नाव आहे. या अपघातात रुद्र अक्षरश: टेम्पोच्या चाकाखाली आला. चिमुकल्याची आई रुपाली या मात्र बचावल्या आहेत. त्या सध्या गंभीर जखमी आहेत. (Accident News)
या अपघातानंतर टेम्पो चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. ( Bibwewadi Accident) पोलिसांच्या तपासात टेम्पो चालकाची माहिती समोर आली आहे. अक्षय पवार (वय 24 रा. सुपर, बिबवेवाडी) असं टेम्पोचालकाचं नाव आहे. तो अपघातानंतर वाहन सोडून पळून गेला आहे. टेम्पो चालवणयासह अक्षय पवार हा वेल्डिंगचं देखील काम करत असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. अपघात झालेला टेम्पो विजय खुरंगुळे यांच्या मालकीचा (Pune Accident News) आहे. त्यांनी तो टेम्पो दुरुस्तीसाठी अक्षय पवार याला दिला होता. सध्या पोलीसांनी तो टेम्पो त्यांच्या ताब्यात घेतला (Tempo Hit Child) आहे. बिबेवाडी पोलीस फरार झालेल्या अक्षय पवारचा शोध घेत आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Apr 08, 2024 02:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

