पुणे: डांगे चौक परिसरात तरूणीवर भरदिवसा हल्ला; 21 वर्षीय आरोपी अटकेत

21 वर्षीय विकास शेटे हा तरूण गौरी माळीवर प्रेम करत होता. मात्र तिचं लग्न दुसर्‍या मुलासोबत ठरल्याचं समजताच त्याने रागाच्या भरात आज (26 जून) डांगे चौकात कामावर जाताना त्याने तरूणीवर धारधार शस्त्रांनी हल्ला केला.

Image used for representational purpose | File Photo

पुण्यामध्ये आज (26 जून) चिंचवडमधील प्रसिद्ध डांगे चौक परिसरात गौरी माळी या 20 वर्षीय तरूणीवर हल्ला करण्यात आला आहे. धारदार शस्त्रांच्या मदतीने तरूणीवर हल्ला करण्यात आल्याने स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या हल्ल्यात विकास शेटे या 21 वर्षीय तरूणाला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार प्रेमप्रकरणातून समोर आल्याचं सांगण्यात येत आहे.

आज सकाळी 10 वाजल्याच्या सुमारास जेव्हा गौरी ऑफिसला जाण्यासाठी निघाला तेव्हा तिच्यावर पाठीवरून वार झाले. डांगे चौकातील स्पंदन हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनीस्ट म्हणून काम करते. पुणे: उधारीच्या पैशांवरुन वाद झाल्याने तरुणाला दगडाने ठेचून मारले

महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, गौरीवर विकास प्रेम करत होता. त्याच्या प्रेमाला प्रतिसाद न देता तिचं लग्न दुसर्‍याच मुलासोबत ठरल्याच विकासला समजलं. त्या रागामधूनच त्याने गौरीवर हल्ला केला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement