प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी आई-वडिलांच्या विरोधात पोटची मुलगी न्यायालयात!
दलित जातीच्या तरुणाशी असलेले नाते मान्य नसल्याने आपले पालक मारहाण करत असे असा आरोप प्रियांका शेटे हिने कोर्टात केला आहे.
जातीय वादावरून (Caste Fights) प्रेमी युगुलांना एकमेकांसपासून वेगळे करण्यासाठी सख्खे पालक सुद्धा कोणत्याही स्तरावर जाऊ शकतात, याची सार्थता पटवून देणारी घटना अलीकडेच अहमदनगर (Ahmednagar) मध्ये पाहायला मिळाली होती, अशाच प्रकारच्या अन्य घटना देखील अगदी सातत्याने पाहायला मिळत आहेत. या प्रकाराने घाबरून पुण्याच्या प्रियांका शेटे (Priyanka Shete) ने आई वडील व नातेवाईकांच्या विरोधात थेट मुंबई उच्च न्यायालयाकडे (Bombay High Court) धाव घेतली आहे. 19 वर्षीय प्रियांकाच्या प्रियकराबाबत घरी समजताच तिच्या पालकांनी तिला रोखायला व मारहाण करायला सुरवात केली.या विरोधात न्यायालयात तक्रार करत प्रियंकाने संविधानातील कलम 21 अंतर्गत आपले पालक वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आणत आहेत असे म्हणत जीवाच्या सुरक्षेची मागणी केली आहे.
पुण्यात राहणाऱ्या प्रियांकाचा प्रियकर, विराज अवघडे हा तरुण दलित वर्गातील असल्याने पालक नातं स्वीकारायला तयार नाहीत. याविषयी माध्यमांना अधिक माहिती देताना प्रियांका सांगते की, "मागील तीन वर्षांपासून आम्ही एकमेकांसोबत आहोत, याबाबत घरी समजताच पालक व सख्ख्या काकांनी मला मारहाण करायला सुरवात केली. इतकच नव्हे तर मला आणि विराजला जीवानिशी मारून टाकण्यासाठी एकदा काकांनी आमच्यावर बंदूक रोखली होती. याविषयी पोलिसांकडे तक्रार केल्यावर मला काहीच प्रतिक्रिया मिळत नव्हती त्यामुळे आता कोर्टातुन मदत मिळावी म्हणून मी हे पाऊल उचलले आहे." आंतरजातीय विवाह: लेकीसह जावयाला पेटवले; अहमदनगर येथील घटना
ANI ट्विट
प्रियंकाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रसिद्ध वकील 'नितीन सातपुते' यांनी प्रियांकाच्या वतीने कोर्टात याचिका दाखल केली आहे. यासंदर्भात कोर्टाकडे मदत मागण्याआधी प्रियंकाने पालकांच्या त्रासाला कंटाळून 22 मार्चच्या सुमारास आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र आता आपल्या प्रेमासाठी लढण्याचा निर्णय घेतलेल्या प्रियांकाने घरून पळून येऊन कोर्टाकडे कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. तूर्तास कोर्टाने पोलिसांना प्रियांकाची तक्रार नोंदवून घेऊन प्रियांका आणि विराज या दोघांनाही संरक्षण पुरवण्याचे आदेश दिले आहेत