Protein Powder विकताना भ्रामक दावे; Supplement Firm ला ग्राहक विवाद निवारण आयोगाची चपराक, भरपाई देण्याचे आदेश

त्यामुळे सदर कंपनीने ग्राहकास नुकसानभरपाई द्यावी असे आदेश उपनगरीय मुंबई जिल्ह्याच्या अतिरिक्त ग्राहक विवाद निवारण आयोगाने दिले आहेत.

Protein Powder | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

प्रोटीन पावडर (Protein Powder) उत्पादनातील घटकांबद्दल दिशाभूल करणारी माहिती पुरवल्याबद्दल बिग मसल न्यूट्रिशन प्रायव्हेट लिमिटेड (BigMuscles Nutrition) दोषी आढळली आहे. त्यामुळे सदर कंपनीने ग्राहकास नुकसानभरपाई द्यावी असे आदेश उपनगरीय मुंबई जिल्ह्याच्या अतिरिक्त ग्राहक विवाद निवारण आयोगाने दिले आहेत. आपल्या आदेशात आयोगाने म्हटले आहे की, तक्रारदाराला लॅब चाचणी शुल्क म्हणून आलेला खर्च जून 2023 पासून सहा टक्के व्याजासह 36,409 रुपये परत करावेत. याशिवाय झालेल्या मानसिक त्रासापोटी कंपनीने ग्राहकास 1 लाख रुपये आणि खटल्यासाठी आलेला खर्च म्हणून 1 लाख रुपये ग्राहास शुल्क म्हणून द्यावेत. (Substandard Protein Powder)

निकृष्ट प्रोटीन विक्रीच्या भ्रामक जाहिराती

राहुल शेखावत हे पवईचे रहिवासी आहेत. तंदुरुस्तीसाठी ते पाठीमागील अनेक वर्षांपासून शारीरिक कसरती करतात. दरम्यान, पाठिमागील वर्षी Amazon वरू त्यांनी 'बिग मसल' नावाची प्रोटीन पावडर 1,599 रुपयांना विकत घेतली. कंपनीकडून केलेल्या जाहिरातीमध्ये दावा केला जातो की, '100% परफॉर्मन्स व्हे प्रोटीन पावडरमध्ये साखर न घालता 24 ग्रॅम उच्च-गुणवत्तेचे प्रोटीन असते," मागवलेली प्रथिने भुकटी त्यांना हवी तितकी परिणामकारक वाटली नाही. त्यामुळे त्यांनी या उत्पादनाची प्रयोगशाळेत चाचणी घेण्याचे ठरवले. चाचणीचा अहवाल प्राप्त होताच कंपनीने केलेले दावे आणि प्रत्यक्ष अहवाल यांमध्ये बरीच तफावत असल्याचे त्यांना जाणवले. त्यामुळे त्यांनी उपनगरीय मुंबई जिल्ह्याच्या अतिरिक्त ग्राहक विवाद निवारण आयोगाकडे तक्रार केली. (हेही वाचा, Donkey's Milk: गाढवाचे दूध, किंमत फक्त 50 रुपयांना एक चमचा; धारावीमध्ये दारोदारी विक्री)

निकृष्ट प्रोटीन पावडर

राहुल शेखावत यांनी तक्रारीत केलेल्या दाव्यानुसार, प्रयोगशाळेच्या निकालांवरून असे दिसून आले की प्रथिने पावडर अज्ञात अमीनो ऍसिडयुक्त होते आणि त्यात साखर आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त होते, जे कंपनीच्या दाव्याच्या विरुद्ध असल्याचे स्पष्ट दिसत होते. राहुलने त्याच्या तक्रारीत असेही नमूद केले आहे की, त्याने कंपनीला या उत्पादनाबाबत शंका घेऊन एक ईमेल पाठवला होता. ज्याच्या उत्तरात कंपनीने असे नमूद केले की हे उत्पादन वापरण्यास पूर्णपणे सुरक्षित आहे आणि त्याचे पौष्टिक मूल्य तितकेच आहे. दावे कंपनीने लॅबच्या अहवालाची लिंक देखील दिली होती, ज्यात दावा प्रमाणित करण्यासाठी त्या उत्पादनावर त्यांच्या वतीने करण्यात आलेली प्रथिने चाचणी दर्शविली होती. तथापि, राहुलने केलेल्या प्रयोगशाळेच्या चाचण्यांमध्ये असे दिसून आले की, प्रथिने पावडरमध्ये कृत्रिमरित्या प्रथिने सामग्री वाढविण्यासाठी अमीनो ऍसिड समाविष्ट गेले होते आणि त्यात सांगितल्यापेक्षा जास्त साखर आणि कर्बोदके आहेत. हे केवळ दिशाभूल करणारे नाही तर ग्राहकांच्या आरोग्यासाठी संभाव्य हानिकारक असल्याचे राहुल यांचा दावा होता.

प्रयोगशाळेतील चाचणी अहवाल:

ॲलनाइन: 8.3343 ग्रॅम

एस्पार्टिक ऍसिड: 1.3689 ग्रॅम

ग्लाइसिन: 1.7589 ग्रॅम

लायसिन: 0.8385 ग्रॅम

टायरोसिन: 2.7378 ग्रॅम

Total Spiking Agents: 15.0384 ग्रॅम

Non-Spiked Protein Content: 08.22 ग्रॅम

Spiked Protein Content: 15.03 ग्रॅम

अहवाल पाहिल्यानंतर आयोगाने असे म्हटले आहे की, अज्ञात अमीनो ऍसिडच्या मदतीने प्रथिने सामग्री वाढवण्याचा प्रयत्न निषेधार्ह आहे आणि तो स्वीकारता येणार नाही. त्यामुळे, विकल्या जाणाऱ्या उत्पादनाच्या सामग्रीबाबत खोटे दावे करणे, ज्यामुळे ग्राहकाच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो, ही निश्चितच सेवेतील कमतरता आहे. हे माहीत असूनही, प्रथिने-स्पायकिंग आहे, असे आयोगाचे मत आहे. ग्राहकांची दिशाभूल करून, कंपनी दिशाभूल करणाऱ्या आणि फसव्या पद्धतीने जाहिराती, वितरण, लेबल, उत्पादन, मार्केट आणि उत्पादनाची विक्री करत राहते, जे अनुचित व्यापार प्रथा आहे. त्यानंतर आयोगाने ग्राहकास आवश्यक नुकसानभरपाई द्यावी, असे आदेश दिले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif