IPL Auction 2025 Live

Property Tax Exemption In Mumbai: मविआ सरकारकडून नववर्षाचे गिफ्ट, मुंबईकरांचा 500 चौरस फुटाखालील घरांचा मालमत्ता कर माफ

मुंबईतील 500 चौरस फुटांखालील घरांना मालमत्ता माफ (Property Tax Exemption In Mumbai) करण्याचा निर्यय राज्य सरकारने घेतला आहे. नगरविकास विभागाच्या एका बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्णयास मान्यता दिली. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाबाबत घोषणा केली आहे.

Uddhav Thackeray | (Photo Credit - Twitter)

महाविकासआघाडी सरकारने मुंबईकरांना नववर्षाचे गिफ्ट ( New Year Gift) दिले आहे. मुंबईतील 500 चौरस फुटांखालील घरांना मालमत्ता माफ (Property Tax Exemption In Mumbai) करण्याचा निर्यय राज्य सरकारने घेतला आहे. नगरविकास विभागाच्या एका बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्णयास मान्यता दिली. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाबाबत घोषणा केली आहे. मुंबईकरांचे 500 चौरस फुटांखालील घरांचे मालमत्ता कर माफ (Property Tax Exemption) करण्याचे अश्वासन शिवसेनेने वचननाम्यात दिले होते. हे अश्वासन आपण पूर्ण करतआहोत अशी भावनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या बैठकीत व्यक्त केली.

ठाकरे कुटुंबीयांची चौथी पिढी मुंबईकरांच्या सेवेत आहे. शिवसेना प्रमुख आणि शिवसेना कधीही केवळ अश्वासन देत नाही. खोटं बोलणं ही शिवसेनेची परंपरा नाही. त्यामुळे शब्द देताना आपण जपूनच देतो. जे होणार असेल तोच शब्द देतो. त्यामुळे वचननाम्यात उल्लेख केलेल्या गोष्टी आपण पूर्णत्वाकडे घेऊन जातो आहोत. आपण शब्द पाळतो म्हणूनच आपण वचननामा देतो. बाकीचे लोक जाहीरनामा देतात,असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी विरोधकांना लगावला. मुंबईमध्ये 500 चौरस फुटांपेक्षा अधिक असलेल्या घरांची संख्या एक लाखांच्याही वर आहे. त्यामुळे लाखो मुंबईकर नागरिकांना मालमत्ता कर माफ केल्याने मोठा दिलासा मिळणार आहे. (हेही वाचा, Uday Samant On Corona Situation: वाढता कोरोना कहर, विद्यापीठ, कॉलेज सुरु की बंद? पाहा काय म्हणाले, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत)

ट्विट

मुंबईच्या विकासासाठी आपल्याला आणखी काही नवे मित्र मिळाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोन नवे मित्र आपल्याला मिळाले आहेत. या मित्रांसोबत आपण पुढे जाऊ, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने काही संकेत दिले.