Fraud: एकत्र राहण्याचे वचन देत पॉवर ऑफ अॅटर्नी घेतली सही, नंतर खर्चासाठी पैसे मागितल्यावर केले अत्याचार, मुलाविरोधात वृद्ध महिलेची तक्रार दाखल
पतीच्या किडनीच्या ऑपरेशननंतर हॉस्पिटलच्या खर्चासाठी पैसे मागितल्यावर 67 वर्षीय वृद्धेवर तिच्या मुलाने अत्याचार केला.
मुंबईतील (Mumbai) एका ज्येष्ठ नागरिकेने तिच्या मुलाविरुद्ध 40 लाख रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी सांताक्रूझ पोलिसांकडे (Santa Cruz Police) धाव घेतली. पतीच्या किडनीच्या ऑपरेशननंतर हॉस्पिटलच्या खर्चासाठी पैसे मागितल्यावर 67 वर्षीय वृद्धेवर तिच्या मुलाने अत्याचार केला. सांताक्रूझ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झैबुनिसा अब्दुल साबरी असे या वृद्ध महिलेचे नाव आहे. जी सांताक्रूझ पश्चिमेकडील एसव्ही रोड येथील रिझवी नगर (Rizvi Nagar) येथे राहते. तिच्या 70 वर्षीय पती आणि मुलीसह तिने पोलिसांना सांगितले की, तिला चार मुली आणि तीन मुले आहेत.
साबरीने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, तिचा मोठा मुलगा झाकीरने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तिच्याशी संपर्क साधला होता. त्याने ओशिवरा येथील त्यांचा एक खोलीचा फ्लॅट विकून तिच्या नावावर सांताक्रूझमध्ये नवीन घर खरेदी करण्याची ऑफर दिली होती. जेणेकरून तो आपल्या कुटुंबासमवेत तेथे शिफ्ट होऊ शकेल. हेही वाचा Fraud: सैन्यात नोकरी देण्याच्या बहाण्याने अनेकांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला अहमदनगर पोलिसांकडून अटक
साबरी पुढे म्हणाले की, फ्लॅट विकल्यानंतर त्याने तिला सांताक्रूझ येथील लिंकिंग रोडवरील दौलत नगरमध्ये नवीन फ्लॅट घेण्यासाठी ₹ 40 लाखांच्या दोन धनादेशांवर स्वाक्षरी करण्यास सांगितले. सांताक्रूझ पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, साबरी म्हणाली की 25 डिसेंबर रोजी तिला तिच्या पतीला मूत्रपिंडाच्या ऑपरेशनसाठी रुग्णालयात दाखल करावे लागले, त्यानंतर 23 जानेवारीला त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
साबरी यांनी तिच्या निवेदनात म्हटले आहे की, जेव्हा मी झाकीरकडे हॉस्पिटलचे बिल भरण्यासाठी पैसे मागितले तेव्हा त्याने पैसे देण्यास नकार दिला. माझ्या कॉलला उत्तर देणे बंद केले. नंतर, मला कळले की त्यांनी माझ्या पतीला त्यांच्या नावाने पॉवर ऑफ अॅटर्नी वर स्वाक्षरी करायला लावली होती. आमची सर्व बचत त्यांनी ताब्यात घेतली होती. तो जो फ्लॅट विकत घेणार होता तो माझ्या नावावर नसून त्याच्या नावावर आहे, असेही मला कळले, साबरी म्हणाले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर, साबरी आणि तिच्या पतीने पोलिसांकडे धाव घेतली. भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 323 आणि 406 नुसार गुन्हा दाखल केला. आम्ही कागदपत्रे तपासत आहोत आणि साबरीच्या तक्रारीची पडताळणी करत आहोत, असे सांताक्रूझ पोलिस स्टेशनचे अधिकारी म्हणाले.