Principal of Dr. D.Y. Patil English High School Pune Beaten Up: मुलींच्या वॉशरूम मध्ये कॅमेरे, विद्यार्थ्यांवर ख्रिश्चन संस्करांचे आरोप करत मुख्यध्यापकाला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी बदडले (Watch Video)

याबाबत पोलिस स्टेशन मध्ये लेखी तक्रार करण्यात अली आहे.

Principal of Dr. D.Y. Patil English High School | Twitter

पुण्याच्या (Pune) तळेगाव (Talegaon) येथील डी वाय पाटील शाळेमध्ये (Dr. D Y Patil School) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेत मुलींच्या स्वच्छतागृहामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले असल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान सीसीटीव्ही कॅमेरे आणि शाळेत ख्रिश्चन धर्माचा प्रसार केला जात असल्याच्या दावा करत बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या काही लोकांनी शाळेत धुडघुस घातला आहे. यावेळेस शाळेचे मुख्याध्यापक Alexander Reid यांना देखील लोकांनी मारहाण केली आहे.

शाळेत Alexander Reid हे विद्यार्थ्यांवर ख्रिश्चन धर्माचे संस्कार करत असल्याच्या, त्यांना 'Our Father Who Art In Heaven'ही प्रार्थना रोज बोलत असल्याचा तसेच हिंदू सणांना सुट्टी देत नसल्याचे आरोप लावण्यात आले आहेत.

सोशल मीडीयातील  वायारल व्हिडीओ 

पुण्याच्या या शाळेमध्ये यंदा योगा दिवस देखील साजरा झालेला नाही. शाळेचा हा मुख्याध्यापक मुद्दामून ख्रिश्चन धर्माचे शिक्षक शाळेत अधिक रूजू करायचा. ज्याद्वारा मुलांवर त्या धर्माचे अधिक संस्कार होतील. बजरंग दलाचे कार्यकर्ते शाळेत घुसल्यानंतर त्यांना मुलींच्या वॉशरूम मध्ये सीसीटीव्ही लावल्याचं आढळून आले आहे. त्यावरून त्यांनी मुख्याधापकाला चोप दिला आहे. Good Touch, Bad Touch: मिठी मारुन चुंबण घेणाऱ्या शिक्षकाचा भांडाफोड; 'गुड टच बॅड टच' उपक्रमात विद्यार्थींनीची धक्कादायक माहिती .

मुख्याध्यापकाला बजरंग दलाचे कार्यकर्ते चोप देत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे. याबाबत पोलिस स्टेशन मध्ये लेखी तक्रार करण्यात अली आहे. अद्याप FIR दाखल झालेला नाही. हा प्रकार समोर आल्यानंतर शाळा प्रशासनाने मात्र मुख्याध्यापकाला सक्तीच्या सुट्टीवर पाठवले आहे.