Mumbai Local Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी मध्य रेल्वेवरील 36 नवीन लोकल ट्रेनला दाखवणार हिरवा कंदील, कार्यक्रमाला मुख्यमंत्रीही राहणार उपस्थित

ते शुक्रवारी ठाणे ते दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान नव्याने बांधण्यात आलेल्या पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गाचे लोकार्पण करतील.

local | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मध्य रेल्वेवरील (Central Railway) 36 नवीन लोकल ट्रेन (Local train) सेवांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. ते शुक्रवारी ठाणे ते दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान नव्याने बांधण्यात आलेल्या पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गाचे लोकार्पण करतील. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.  पंतप्रधान 18 फेब्रुवारी रोजी मध्य रेल्वेवर नवीन लोकल लोकलना हिरवा झेंडा दाखवतील. 36 नवीन लोकल ट्रेन सेवांचा लाभ 2.7 दशलक्ष प्रवाशांना मिळेल.  या प्रकल्पाची 2008 मध्ये घोषणा करण्यात आली होती आणि आता 620 कोटी रुपये खर्च करून पूर्ण करण्यात आला आहे, असे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

36 पैकी 34 नवीन वातानुकूलित (AC) लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) कल्याण/कसारा आणि कर्जत रेल्वे स्थानकांदरम्यान सुरू करण्यात येणार आहेत. दानवे पुढे म्हणाले की, मोदी सरकारने 2015 ते 2021 या कालावधीत महाराष्ट्रात राबविण्यात येणाऱ्या रेल्वे प्रकल्पांसाठी  11,000 कोटींची तरतूद केली आहे. तर 2009 ते 2014 या कालावधीत आधीच्या UPA सरकारने केवळ ₹ 1,100 कोटींची तरतूद केली होती. हेही वाचा Nana Patole Statement: 10 मार्चनंतर राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता, नाना पटोलेंनी दिले संकेत

मोदी सरकारच्या काळात महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातील तरतूद दहा पटीने वाढली आहे. महाराष्ट्रात विकास आणि रेल्वेचा विकास होणारच. रेल्वे मार्गावरील लोकांचे पुनर्वसन हा राज्य सरकारचा प्रश्न आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेश आणि कायद्याच्या चौकटीत निर्णय व्हायला हवेत, दानवे म्हणाले. नवीन रेल्वे सेवा सुरू होणार असल्याने मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर 44 एसी लोकल ट्रेन सेवा चालवल्या जातील.

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील रेल्वे सेवा वाढवण्यासाठी सीएसएमटी आणि पनवेल रेल्वे स्थानकांदरम्यान चालणाऱ्या हार्बर रेल्वेवरून एक एसी ट्रेन सोडण्यात येणार आहे. ठाणे आणि दिवा दरम्यानचा पाचवा आणि सहावा रेल्वे मार्ग प्रकल्प हा मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाचा (MUTP 2B) एक भाग आहे. ज्याला 2008 मध्ये मंजुरी मिळाली होती. मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन (MRVC) ने प्रकल्पाचे बांधकाम हाती घेतले आणि सुरू करण्याचे काम पूर्ण केले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif