Nisarga Cyclone: चक्रीवादळात नागरिकांनी काय विशेष काळजी घ्यावी, वाचा सविस्तर

त्यामुळे राज्यात मुंबई सह इतर भागात पावसाचा रेड अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.

Cyclone Representative Image (Photo Credits: IANS)

महाराष्ट्र आधीच कोरोना व्हायरसने (Coronavirus) त्रासून गेला असताना आता एक नवीन संकट येऊन धडाडणार आहे ते म्हणजे 'निसर्ग' चक्रीवादळाचे (Nisarg Cyclone). महाराष्ट्रासह गुजरात राज्यावर असलेलं 'निसर्ग चक्रीवादळा'चं संकट आता अधिक गहिरं होत आहे. आज भारत सरकारने जारी केलेल्या हवामान अंदाजपत्रामध्ये अरबी समुद्रामध्ये पुढील 12 तासामध्ये कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता अधिक वाढून चक्रीवादळ अधिक मजबूत होणार आहे. हे चक्रीवादळ उद्या (3 जून) ला महाराष्ट्रात रायगड जवळ हरिहरेश्वरच्या किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात मुंबई सह इतर भागात पावसाचा रेड अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या राज्यात योग्य ती खबरदारी घेतली जात असून नागरिकांनीही विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

चक्रीवादळ म्हटले की नागरिकांच्या जीवाचा थरकाप उडतो. अशा वेळी काय करावे आणि काय करु नये हे सूचत नाही. मात्र नागरिकांनी अशा परिस्थितीत घाबरून न जाता धीराने घेतले पाहिजे. तसेच आपल्या घरात काही ठराविक गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

Nisarga Cyclone: निसर्ग चक्रीवादळ संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्रात एनडीआरएफ पथक तैनात- एस. एस. प्रधान

चक्रीवादळात घ्यायची विशेष काळजी:

1. घरातील सर्व विद्युत उपकरणे मुख्य स्विच बंद करावे.

2. अफवांकडे दुर्लक्ष करा, घाबरू नका.

3. पावसाचा जोर लक्षात घेता आपली कागदपत्रे,मौल्यवान वस्तू प्लॅस्टिकच्या बॅगेत अथवा कंटेनरमध्ये ठेवा.

4. कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्यासाठी आपले मोबाइल फोन चार्ज ठेवा; एसएमएस वापरा.

5. गॅसचा पुरवठा बंद करा

6. उकळलेले पाणी प्या. घरात पुरेसा अन्नाचा साठा करुन ठेवा.

7. आपत्कालीन किट तयार करा.

8. प्रशासन सांगेपर्यंत समुद्रात जाऊ नका.

9. तुटलेल्या विद्युत खांब व तारा व इतर तीक्ष्ण वस्तूपासून सरक्षित रहा.

10. प्रशासनाने दिलेले आपत्कालीन क्रमांक जवळ असू द्या. गरजेस संपर्क साधून बोलावून घ्या.

निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये धडकण्याचा अंदाज असला तरीही मुंबई, केरळ, कर्नाटक, गोवा या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम किनारपट्टी लगत असणार्‍या मच्छिमारांना समुद्रामध्ये न जाण्याचा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रामध्ये गेलेल्या बोटी देखील माघारी बोलावण्याचं काम एनडीआरएफकडून करण्यात आलं आहे