Pratibha Pawar: प्रतिभा पवार यांची प्रकृती बिघडली, मुंबई येथील ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल

प्रतिभा पवार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पत्नी (Sharad Pawar Wife) आहेत. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. ही शस्त्रक्रिया नेमकी कोणत्या कारणास्तव आणि कोणत्या प्रकारची आहे याबाबत माहिती मिळू शकली नाही.

Pratibha Pawar, Sharad Pawar | | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Pratibha Pawar Admitted to Breach Candy Hospital in Mumbai: प्रतिभा पवार यांना मुंबई येथील ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रतिभा पवार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पत्नी (Sharad Pawar Wife) आहेत. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. ही शस्त्रक्रिया नेमकी कोणत्या कारणास्तव आणि कोणत्या प्रकारची आहे याबाबत माहिती मिळू शकली नाही. शरद पवार (Sharad Pawar) हे सुद्धा तातडीने ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल झाल्याचे समजते आहे.

शरद पवार हे राज्य आणि देशाच्या राजकारणात नेहमीच केंद्रस्थानी असतात. असे असले तरी प्रतिभा पवार यांनी मात्र केव्हाही राजकीय महत्त्वाकांक्षा दाखवली नाही. इतकेच नव्हे तर राजकीय कार्यक्रमांनाही त्या फारशा उपस्थित नसतात. अपवादात्मक स्थितीमध्ये त्या शरद पवार यांच्या सोबत किंवा स्वतंत्रपणे केव्हातरीच त्या अशा कार्यक्रमांना उपस्थित राहतात. मितभाषी स्वभाव आणि कामातील नीटनेटकेपणा ही त्यांची स्वभाववैशिष्ट्ये असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. (हेही वाचा, Ganeshotsav 2020: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, रश्मी ठाकरे, प्रतिभा पवार यांनी घेतले वर्षा बंगल्यावरील गणपतीचे दर्शन)

महाराष्ट्राच्या राजकारण आणि जडणघडीत बारामतीच्या पवार कुटुंबीयांचा मोठा वाटा आणि भूमिका नेहमीच राहिली आहे. पाठीमागील अनेक दशके महाराष्ट्राचे राजकारण पवार कुटुंबीयांच्या भोवती फिरते आहे. दरम्यान, पाठिमागच्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीमुळे पवार कुटुंबीय जोरदार चर्चेत आले. मात्र, शरद पवार सुप्रिया सुळे आणि रोहीत पवार वगळता पवार कुटुंबीयांतील कोणीही अजित पवार यांच्या राजकीय निर्णयावर भाष्य केले नाही.

अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांना सोबत घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारमध्ये सहभाग नोंदवला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या दुसऱ्या शपथविधीमध्ये पहिल्या दणक्यातच त्यांनी आपल्या समर्थक आमदारांपैकी स्वत:सह नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. महाराष्ट्राच्या राजकारणात ही अत्यंत महत्त्वाची आणि खळबळजणक घडामोड मानली जात आहे. खास करुन गेली अनेक दशके राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शरद पवार यांच्यासाठी हा अत्यंत मोठा धक्का मानला गेला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif