IPL Auction 2025 Live

MPSC Main Final Result 2019 Topper List: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतिम परीक्षेत साता-याचा प्रसाद चौगुले राज्यात पहिला, येथे पाहा उत्तीर्ण विद्यार्थ्यांची यादी

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संपूर्ण यादी पाहण्यासाठी काय कराल?

Results 2020 | File Photo

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 13 ते 15 जुलै 2019 दरम्यान राज्य सेवा मुख्य परीक्षा 2019 घेण्यात आली होती. या परीक्षेला बसलेल्या सर्वच विद्यार्थ्यांचे अंतिम निकालाकडे लक्ष होते. या परीक्षेत साताऱ्याचा प्रसाद चौगुलै (Prasad Chaugule) राज्यात पहिला आला आहे. उस्मानाबाद येथे जिल्ह्यातील रविंद्र शेळके (Ravindra Shelke) हा विद्यार्थी मागासवर्गीयांमधून पहिला आहे आहे. महिला वर्गवारीतून अमरावती जिल्ह्यातील पर्वणी पाटील (Parvani Patil) पहिली आली आहे.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संपूर्ण यादी पाहण्यासाठी काय कराल?

हेदेखील वाचा- MPSC Mains Final Result 2019: राज्यसेवा मुख्य परीक्षा निकाल जाहीर; mpsc.gov.in वर पाहता येणार निकाल, कट ऑफ, मेरिट लिस्ट

1. mpsc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

2. त्यानंतर या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला उत्तीर्ण विद्यार्थ्यांची माहिती, कट ऑफ लिस्ट व अन्य माहितीची PDF मिळेल.

एपीएससीच्या मुख्य परीक्षेसाठी राज्यातील एकूण 6825 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यामधून 1326 विद्यार्थी मुलाखतीसाठी निवडण्यात आले आहेत. त्यामधील 420 जणांची अधिकारी म्हणून निवड करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना जर पुनर्मुल्यांकनासाठी अर्ज करायचा असल्यास त्यांनी निकाल लागल्यानंतरच्या 10 दिवसाच्या आतमध्ये ऑनलाईन पद्धतीने करावा असे आवाहन आयोगाकडून करण्यात आले आहे.

कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक कोलमडले आहे. मात्र याच दरम्यान आता एपीएससीच्या मुख्य परीक्षेचा निकाल आयोगाकडून जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच महाराष्ट्र लोक सेवा आयोग यांची राज्य सेवेची पूर्व परीक्षा 13 सप्टेंबरला होणार आहे.