पवई येथे चोरी केल्याच्या संशयावरुन मेट्रो बांधकामाच्या ठिकाणावरील 4 गार्ड्कडून 17 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण, मृत्यू

मेट्रो बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी तेथील कच्चा माल चोरी केल्याच्या संशयावरुन एका 14 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मेट्रो बांधकामाच्या ठिकाणावरील गार्ड्सकडून त्या मुलाला मारले गेले.

प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

मेट्रो बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी तेथील कच्चा माल चोरी केल्याच्या संशयावरुन एका 14 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मेट्रो बांधकामाच्या ठिकाणावरील गार्ड्सकडून त्या मुलाला मारले गेले. ही घटना पवई येथे घडली असून तरुणाने मेट्रोचे काम सुरु असलेल्या परिसरातून पाईप चोरी केल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला. तर अनिकेत बनसोडे असे मारहाण करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे.(पालघर: तारापूर MIDC येथील बजाज हेल्थकेअर युनिटला आग, 30 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले) 

या प्रकरणी पवई पोलिसांकडून उमेश परब (38), सुजत अली नौशेद अली (26), सचिन मांडवकर (38) आणि संदीप जाधव (30) यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी असे म्हटले की, सदर मुलगा पवईतील मिलिंद नगर येथील राहणारा होता. तर मंगळवारी रात्री सिक्युरिटी गार्ड्सने त्याला मेट्रोच्या येथील पाईप चोरताना पाहिले. गार्ड्ससह त्याच्या तीन साथीदारांनी मिळून त्याला लोखंडाचे रॉड आणि बांबूच्या काठ्यांनी जबदरस्त मारहाण केली. (मीरा-भाईंदर परिसरातील 60 वर्षीय स्वयंघोषित धर्मगुरुचा 16 वर्षांच्या मुलीवर बलात्कार; आरोपीला अटक)

तरुणाला मारहाण केल्यानंतर त्याला मिलिंद नगर येथील रस्त्यावर जखमी अवस्थेत सोडून दिले. मात्र त्याचवेळी एका मुलाने अनिकेत याला मारहाण झाल्याचे पाहिले असता त्याने तातडीने त्याच्या नातेवाईकांना कळवले. अनिकेत याला लगेच राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. तसेच गार्ड्सची चौकशी सुद्धा केली गेली. त्यावेळी त्यांनीच अनिकेत याला मारहाण केल्याचा गुन्हा कबुल केला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement