Mumbai: वर्सोवा-विरार सीलिंक पालघरपर्यंत वाढवण्याची शक्यता
प्राधिकरणाने या मार्गावर प्रवेश-नियंत्रित सी लिंक तयार करण्याची देखील योजना आखली आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
प्रस्तावित वर्सोवा-विरार सीलिंक (Versova-Virar Sealink), जो मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) बांधणार आहे, तो पालघरपर्यंत वाढवला जाण्याची शक्यता आहे. सीलिंक पूर्वी केवळ विरारपर्यंत प्रस्तावित असल्याने, एमएमआरडीए विस्तारित भागाचा पूर्व व्यवहार्यता अभ्यास करेल. प्राधिकरणाने या मार्गावर प्रवेश-नियंत्रित सी लिंक तयार करण्याची देखील योजना आखली आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. सीलिंक यापूर्वी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) बांधणार होते. मात्र, नंतर हा प्रकल्प एमएमआरडीएकडे हस्तांतरित करण्यात आला.
सध्या MSDRC वांद्रे-वर्सोवा सीलिंक बांधत आहे. शहराचा पहिला सीलिंक - वरळी आणि वांद्रे यांना जोडणारा. जो 2009 मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता, तो आधीच बांधला आहे. MMRDA अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, प्रस्तावित सीलिंक महत्त्वपूर्ण कनेक्टिव्हिटी प्रदान करेल, प्रवाशांची सिग्नल-मुक्त हालचाल सुलभ करेल. कोस्टल रोड, मुंबई ट्रान्स हार्बर सीलिंक आणि विरार अलिबाग कॉरिडॉरसह रिंग रोड कनेक्टर म्हणून काम करेल. हेही वाचा Gram Panchayat Bypolls Election 2023: राज्यातील ग्रामपंचायतीमधील 3666 रिक्त जागांसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी घोषणा; 18 मे ला होणार मतदान
दरम्यान, वर्सोवा-विरार सीलिंक प्रकल्पाची किंमत 8,000 कोटी रुपयांनी वाढली आहे. सुधारित खर्च आता 40,000 कोटी रुपये आहे तर पूर्वीचा अंदाजित खर्च 32,000 कोटी रुपये होता. अॅक्सेस कंट्रोल रोडचा अभ्यास करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती केल्यामुळे आणि इतर कामांबरोबरच पीअर रिव्ह्यू करण्यासाठी समर्पित सल्लागार नियुक्त केल्यामुळे प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाली आहे.