Porsche On Pune Accident: 'पोर्श कारमध्ये कोणतीही तांत्रिक समस्या नव्हती', पुणे अपघात प्रकरणी कंपनीकडून स्पष्टोक्ती

या अपघातास पोर्श कार कारणीभूत नाही तसेच, ही घटना घडली तेव्हा कारमध्ये कोणत्याही प्रकारचा तांत्रिक दोष नव्हता, असे स्पष्टीकरण पोर्श कार कंपनीच्या (Porsche On Pune Accident) अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Pune Porsche Accident

Pune Porsche Update: पुणे येथे अल्पवयीन मुलाने बेदरकारपणे चालवलेल्या पोर्श कारने धडक (Pune Porsche Crash) दिल्याने दोघांचा मृत्यू झाला. या अपघातास पोर्श कार कारणीभूत नाही तसेच, ही घटना घडली तेव्हा कारमध्ये कोणत्याही प्रकारचा तांत्रिक दोष नव्हता, असे स्पष्टीकरण पोर्श कार कंपनीच्या (Porsche On Pune Accident) अधिकाऱ्यांनी दिली आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कारबाबत एक अहवालच दिला आहे. हा अहवाल पोलिसांना सादर करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणाशी संबंधीत लोकांना अटक झाली असून, पुणे पोलीस प्रकरणाचा तपास अद्यापही करत आहे.

बंगळुरु येथील डिलरकडून कार खरेदी

महाराष्ट्र परिवहन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोर्श या लक्झरी कारची कायमस्वरूपी नोंदणी मार्चपासून प्रलंबित होती. मालक, आरोपी किशोरच्या वडिलांनी 1,758 रुपये शुल्क भरले नव्हते, ज्यामध्ये 1,500 रुपये हायपोथेकेशन फी, 200 रुपये स्मार्ट कार्ड आरसी फी आणि 58 रुपये पोस्टल शुल्क यांचा समावेश होता. पोर्श कार पुण्याच्या नव्हे तर बेंगळुरूमधील डीलरकडून खरेदी केली गेली होती आणि त्याच्याकडे मार्च ते सप्टेंबर 2024 पर्यंत वैध तात्पुरते नोंदणी प्रमाणपत्र होते. अधिका-यांनी सांगितले की, तात्पुरती नोंदणी पूर्ण झाल्यानंतर कार सुपूर्द करण्यात आल्याने बेंगळुरू डीलरची चूक नव्हती.

आरोपी मद्यधुंद अवस्थेत

महाराष्ट्राचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी पीटीआयला माहिती देताना सांगितले की, कारची सध्याची तात्पुरती नोंदणी रद्द केली जाईल आणि मोटार वाहनांच्या (MV) कायदा तरतुदींनुसार 12 महिने कोणत्याही प्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) नोंदणी करण्याची परवानगी दिली जाणार नाही. महाराष्ट्रात नोंदणीकृत इलेक्ट्रिक वाहनांना रोड टॅक्समध्ये सूट देण्यात आली आहे. अपघाताच्या वेळी पोर्शे चालवत असताना आरोपी मद्यधुंद अवस्थेत होता. त्याच्यावरील आरोपाची या युवकाने पोलिसांकडे चौकशीदरम्यान कबुलीही दिली आहे. त्या जीवघेण्या रात्रीच्या घटना मला पूर्णपणे आठवत नसल्याचेही त्यांनी सांगितले. (हेही वाचा, Pune Porsche Accident: पोर्शे कार अपघात प्रकरण; अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार, 2 डॉक्टरांना अटक )

आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी गाजले प्रकरण

अल्पवयीन मुलाने बेदरकारपणे कार चालवल्याच्या घटनेमुळे घडलेल्या अपघातानंतर या प्रकरणाने बरीच वळणे घेतली. अल्पवयीनआरोपीचे पालक शिवानी अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांना या प्रकरणात 5 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीला वाचविण्यासाठी त्याच्या रक्ताच्या नमुन्याशी छेडछाड केल्याचा आरोपही झाला. दरम्यान, आरोपीचे आजोबा, पुण्यातील ससून सामान्य रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि एका कर्मचाऱ्यालाही या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

या घटनेच्या संदर्भात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी एक अपघाताशी संबंधित दुसरा अल्पवयीन मुलाला कथितरित्या दारू पुरवणाऱ्या बारच्या विरोधात आणि तिसरा चालकाला चुकीच्या पद्धतीने कोंडून ठेवल्याबद्दल आणि आपघाताबद्दल दोषी धरण्याबाबतचा आहे. घटनेचा तपास अद्यापही सुरुच आहे.