Highest Polling Station: अवघ्या 160 मतदारांसाठी निवडणूक पथकाचा खडतर प्रवास; मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी लोखंडी शिडीच्या मदतीने केला तासभर ट्रेक (Watch Video)
मात्र, पथकाला तिथे पोहचण्यासाठी मोठे परिश्रम घ्यावे लागले. पथकाने लोखंडी शिडी(Iron Ladder)च्या साहाय्याने तासभर ट्रेक करत मोठा पल्ला गाठला.
Highest Polling Station: निवडणूकांमध्ये प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावावा यासाठी निवडणूक आयोग अथक प्रयत्न करत आहे. योग्य उमेदवार निवडणून यावा यासाठी प्रत्येक वोट महत्त्वाचे असते. पुण्यातील रायरेश्वर येथे 160 मतदारांसाठी मतदान केंद्र (Polling Station)उभारण्यात आले आहे. हे मतदान केंद्र डोंगराळ भागात असल्याने मतदान केंद्रापर्यंत पोहचण्यासाठी कर्मचाऱ्यांना (Polling Team) अतिशय खडतर प्रवास करावा लागला आहे. पथकाला लोखंडी शिडी(Iron Ladder)च्या साहाय्याने तासभर ट्रेक करावे लागले. त्यानंतर पथक मतदान केंद्रावर पोहोचले. डोंगराळ भाग असल्याने पथकाचा हा जीवघेणा प्रवास होता. (हेही वाचा:Baramati Lok Sabha Election 2024: बारामती मध्ये बुरूडमाळ गावात अवघ्या 41 मतदारांसाठी उभं राहिलं 77 वर्षांत पहिल्यांदा मतदान केंद्र! (Watch Video) )
बारामतीमध्ये 41 मतदारांसाठी हे मतदान केंद्र उभारले
बारामती मध्ये बुरूडमाळ गावात मागील 77 वर्षांत पहिल्यांदा मतदान केंद्र उभं राहिलं आहे. अवघ्या 41 मतदारांसाठी हे मतदान केंद्र उभारण्यात आलं आहे. बुरूडमाळ हे पुण्यातील सर्वात लहान मतदान केंद्र आहे. या गावात मागील फेब्रुवारी महिन्यापर्यंत रस्ता नसल्याने गावकर्यांना 12 किमी दूर सांघवी गावात जाऊन मतदान करावं लागत होते मात्र आता पहिल्यांदाच या गावकर्यांना त्यांचं मतदान केंद्र मिळालं आहे. बुरूडमाळ च्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये हे मतदान केंद्र सुरू करण्यात आले आहे.