Maharashtra Police Bharti 2024: राज्यात लवकरच पोलीस भरती, तरुणांना मोठी संधी

महाराष्ट्र पोलीस भरती (Maharashtra Police Bharti 2024) द्वारे राज्य सरकारी सेवेl नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी चांगली संधी आहे. राज्य सरकारने पोलीस भरती काढली असून, त्याबाबतची प्रक्रिया येत्या डिसेंबर (2024) महिन्यात पार पडणार आहे.

Maharashtra Police Bharti 2024: राज्यात लवकरच पोलीस भरती, तरुणांना मोठी संधी
Maharashtra Police Bharti | (File Image)

Maharashtra Police Recruitment 2024: राज्यात नुकतीच एक भरती प्रक्रिया पार पडली. ज्यामध्ये जवळपास 35 हजार तरुणांना पोलीस सेवेत रुजू होण्याची संधी मिळाली. मात्र, या भरतीमध्ये अपयशी ठरलेल्या किंवा नव्याने प्रयत्न करत असलेल्या तरुणांना डिसेंबर महिन्यातील भरतीमुळे संधी मिळणार आहे.

रिक्त जागांसाठी भरती

पोलीस भरती राबविण्यासाठी राज्य सरकार पाठिमागील अनेक वर्षांपासून विचार करत आहे. दरम्यान, सन 2022 मध्ये भरतीबाबत घोषणा करण्यात आली. मात्र, प्रत्यक्ष भरती 2023 मध्ये झाली. या भरतीमध्ये पोलीस दलातील सर्वच जागा भरल्या गेल्या नाहीत. अद्यापही अनेक जागा रिक्त आहेत. या जागांसाठीच डिसेंबरमध्ये भरती केली जाणार आहे. दरम्यान, पदे आणि एकूण जागांबाबत निश्चित माहिती मिळू शकली नाही. त्याबाबत अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपण माहिती घेऊ शकता.

पोलीस दलाला मनुष्यबळाची गरज

सेवानिवृत्ती, बदली, बडतर्फी, बडती अशा विविध कारणांमुळे पोलीस दलात अनेक जागा रिक्त होतात. त्या जागा जर वेळीच भरल्या नाहीत तर त्या साचत राहतात आणि त्याचा एकूण आकडा मोठा होतो. अशा वेळी राज्य सरकारवरही एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर भरती करणे एक आव्हान असते. कारण, नव्याने भरती केलेल्या पोलिसांसाठी वेतनाची व्यवस्था, इतर यंत्रणा उभी करण्यासाठीही मोठा खर्च होतो. त्यामुळे राज्य सरकार नेहमीच भरतीचे आश्वासन देते. मात्र, जाहीर केलेल्या एकूण भरतीच्या आकड्यापेक्षा टप्प्याटप्प्याने भरती काढते.

दरम्यान, राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये नुकतीच पोलीस भरती पार पडली. या भरतीमध्ये आठ जिल्ह्यांत चालक शिपाई व पाच जिल्ह्यांत बॅण्डसमॅनची लेखी परीक्षा पार पडली. इतर जिल्ह्यांमध्ये भरती प्रक्रिया अजूनही सुरु असून लवकरच ती पूर्ण केली जाणार आहे. राज्य सरकारने त्याबाबत संबंधीत यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, पोलिसांकडील मनुष्यबळ वाढल्यानंतर राज्यातील कायदा व सुव्यवस्था आणि सुलक्षेतही मोठी वाढ होणार आहे. मनुष्यबळ वाढल्याने राज्यातील गुन्हेगारी बऱ्यापैकी कमी होईल, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. राज्य पोलीस दलामध्ये संधी मिळावी यासाठी राज्यभरातील तरुण प्रयत्नशील असतात. गावखेड्यातील तरुणांसाठी हे नोकरीचे एक महत्त्वाचे दालन समजले जाते.

(The above story first appeared on LatestLY on Aug 20, 2024 04:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).