गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांविरोधात पोलिसात तक्रार
तुमची लायकी काय आहे पाहा', असे सांगत केसरकर यांनी आपल्याला दालनातून हाकलून दिले. त्यांनी आपले काहीच ऐकले नाही, असा या महिलांचा आरोप आहे.
गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याविरोधात मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. मंत्री केसरकर यांना भेटण्यासाठी बलात्कारपीडित मायलेकी मंत्रालयात आल्या होत्या. या वेळी केसरकर यांनी त्यांचे गाऱ्हाणे ऐकूण घेण्याऐवजी त्यांना हाकलून दिले, असा आरोप केसरकर यांच्यावर या महिलांनी केला आहे. त्यानंतर त्यांनी पोलिसात जाऊन तक्रार दिली.
'जास्त बोलू नका. तुमची लायकी काय आहे पाहा', असे सांगत केसरकर यांनी आपल्याला दालनातून हाकलून दिले. त्यांनी आपले काहीच ऐकले नाही, असा या महिलांचा आरोप आहे.
प्रसारमाध्यमातून आलेल्या वृत्तानुसार, या मायलेकींवर दीड वर्षांपूर्वी (मे, २०१७) सामूहिक बलात्कार झाला होता. मात्र, या प्रकरणाची दखल घेऊन तक्रार दाखल करुन घ्यायलाही पोलिसांनी तब्बल दीड महिन्यांचा कालावधी घेतला. तसेच, पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधींनी हस्तकक्षेप केल्यामुळे किंवा दबाव टाकल्यामुळे या प्रकरणात एकूण सात आरोपी असूनही केवळ एकावरच गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता तर, गुन्हा मागे घेतला जावा, यासाठी आरोपींकडून दबाव टाकला जात आहे. या अन्यायाला न्याय मिळावा म्हणूनच आपण केसरकर यांच्याकडे गेलो होतो. मात्र, त्यांनी आपले काहीही ऐकूण न घेता थेट आपल्याला दालनाबाहेरच हाकलल्याचा आरोप या पीडित महिलांनी केला आहे.