PM Modi Mumbai Visit: १९ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर, विविध वास्तुंच्या लोकार्पण सोहळ्याची शक्यता
दरम्यान मेट्रो 2 A आणि मेट्रो 7 चं लोकार्पण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गेल्या महिन्यातचं राज्याची राजधानी नागपूर येथे पंतप्रधान मोदींच्या हस्ते समृध्दी महामार्गाचा उद्घाटन सोहळा पार पडला. दरम्यान नागपुर मेट्रोच्या पुढील टप्प्यांचा लोकार्पण सोहळा देखील पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडला. तरी आता पुन्हा एक पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात दाखल होणार आहे. म्हणजेच येत्या 19 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान मेट्रो 2 A आणि मेट्रो 7 चं लोकार्पण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तरी मुंबईसह पंतप्रधान मोदी ठाण्यात देखील हजेरी लावणार असल्याची माहिती मिळत आहे. विविध उद्घाटन सोहळे किंवा भाजपाचा जंगी कार्यक्रम असं या कार्यक्रमा मागचं कारण सांगण्यात येत असलं तरी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर हे सगळे बडे दौरे भाजप घडवून आणत असल्याची चर्चा राज्यातील राजकीय वर्तुळात रंगली आहे. गेल्या आठवड्यातचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुंबई दौरा करुन गेलेत त्यानंतर आता थेट देशाचे पंतप्रधान मुंबई दौरा करणार आहे म्हण्टल्यावर भाजप मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची मजबूत तयारी करताना दिसत आहे.
भाजप मिशन मुंबई महापालिकेच्या कसुन तयारीला लागली आहे. त्यात आता पंतप्रधान मोदींचा दौरा म्हणजे यावर शिक्कामोर्तब करणाराचं. मोदींच्या स्वागतासाठी मुंबई आणि प्रदेश भाजपने जोरदार तयारी केली आहे. या संदर्भात आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सह्याद्रीवर महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. भाजपने मिशन मुंबई महापालिका निवडणूक सुरू केलं आहे. मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या दौऱ्याला मोठे महत्त्व आहे. (हे ही वाचा:- BDD Chawl Redevelopment: पात्र रहिवाशांना मिळणार 300 चौरस फूट कार्पेट एरियासह अनेक सुविधा, जाणून घ्या सविस्तर)
२०२३ या नव्या वर्षात आणि महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा पहिलाचं मुंबई दौरा आहे. तरी या दौऱ्या दरम्यान पंतप्रधान मोदी काय बोलतात किंवा राज्यातील राजकारणात काय खलबत घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान पंतप्रधान मोदींच्या भेट घेण्यासाठी राज्यातील विविध बडी लोक मुंबईत दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.