PM Modi Mumbai Visit Traffic Advisory: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल, अनेक निर्बंध
या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीकोणातून चौख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. व्हीव्हीआयपींच्या भेटीमुळे शहरातील काही भागांतील वाहतुकीवर परिणाम होणार आहे.
PM Modi Mumbai Visit Traffic Advisory: मुंबईतील सुमारे 38 हजार कोटींच्या प्रकल्पाचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीकोणातून चौख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. व्हीव्हीआयपींच्या भेटीमुळे शहरातील काही भागांतील वाहतुकीवर परिणाम होणार आहे. गैरसोय टाळण्यासाठी प्रत्येक मुंबईकराने वाहतुकत झालेला बदल लक्षात घेणे आवश्यक आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांच्या पहिल्या मुंबई दौऱ्यात पंतप्रधान मोदी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) प्रदर्शन मैदानावर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांना संबोधित करतील. या सभेत ते काय बोलतात याबाबत उत्सुकता आहे.
PM मोदी सुमारे 12,600 कोटी रुपयांच्या मुंबई मेट्रो रेल्वे लाईन्स 2A आणि 7 वर झेंडा दाखवतील. दहिसर पूर्व आणि डीएन नगर (Yellow Line) यांना जोडणारी मेट्रो लाईन 2A सुमारे 18.6 किमी लांब आहे, तर अंधेरी ई - दहिसर ई (Red Line) यांना जोडणारी मेट्रो लाईन 7 सुमारे 16.5 किमी लांब आहे. या लाईनची पायाभरणीही 2015 मध्ये पंतप्रधान मोदींनी केली होती. बेलापूर आणि खारघरच्या सेंट्रल पार्क स्थानकांना जोडणाऱ्या नवी मुंबई मेट्रोच्या 5.96 किमी लांबीच्या मार्गाचे उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत. (हेही वाचा, PM Modi Mumbai Visit: १९ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर, विविध वास्तुंच्या लोकार्पण सोहळ्याची शक्यता)
मेट्रो निश्चित कालावधीसाठी बंद
- नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त बीकेसी आणि गुंडवाली मेट्रो स्थानक राहणार बंद.
- वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर दक्षिण वाहिनी (कुलाबाकडे) दुपारी 4.15 ते सायंकाळी 5.30 या काळात राहणार बंद.
उत्तरवाहिनी (दहिसरकडे) 5.30 ते 5.45 या वेळेत वाहतूक संथ गतीने सुरु राहणार
- दरम्यान, पश्चिम दृतगती महामार्ग, धारावी, वरळी सिलींककडून बिकेसी परिसर आणि कुर्लाच्या दिशेने जाणारी सर्व वाहने फॅमिली कोर्ट जंक्शनकडून पुढे कुर्ल्याच्या दिशेने जाण्यासाठी निश्चित काळासाठी बंद असतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान वाहतूक व्यवस्थेत वेळोवेळी बदल केला जाईल. बदलत्या वाहतूक व्यवस्थेची माहिती मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागातर्फे नागरिकांना विविध माध्यमातून वेळोवेळी देण्यात येणार आहे. शिवाय अधिक माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांक आणि ट्विटरवर संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.