रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ पिंडदानाचा कार्यक्रम? घटनेचा Video Viral

रायगडावर 24 सप्टेंबरला शिवरायांच्या दुसर्‍या राज्याभिषेकाचा सोहळा गडावर एकीकडे सुरू असताना दुसरीकडे अशाप्रकारे पिंडदानाचा कार्यक्रम सुरू असल्याने शिवप्रेमींनी आपला संताप व्यक्त केला आहे

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj)  यांचं स्मृतिस्थळ असलेल्या किल्ले रायगडावर (Raigad) महाराजांच्या समाधीस्थळाजवळच पिंडदान (Pindadan) होत असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे. या वायरल व्हिडिओ मध्ये पिंडदानाशी साधर्म्य असणारे विधी सुरू असल्याचं दिसत आहे मीडीया रिपोर्टसनुसार, काही शिवप्रेमींना या विधी दरम्यान त्यांना हटकलं आणि संबंधित व्यक्ती तेथून निघून गेल्या. मात्र याबाबत पोलिसांकडून किंवा अन्य संबंधित समितींकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

रायगडावरील हा प्रकार काल 24 सप्टेंबरचा आहे. शिवरायांच्या दुसर्‍या राज्याभिषेकाचा सोहळा गडावर एकीकडे सुरू असताना दुसरीकडे अशाप्रकारे पिंडदानाचा कार्यक्रम सुरू असल्याने शिवप्रेमींनी आपला संताप व्यक्त केला आहे. संभाजी ब्रिगेडने या मध्ये राज्यसरकार, मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं अशीही मागणी केली आहे. तसेच रायगडावरील सुरक्षा राम भरोसे आहे का? असा सवालही त्यांनी विचारला आहे.

वायरल होत असलेला व्हिडिओ

काही दिवसांपूर्वीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ पुस्तक पूजेचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दोघेजण राख घेऊन समाधीजवळ पुस्तकाची पूजा करत असताना निदर्शनास आले होते. त्यानंतर शिवभक्तांकडून पोलिसांनी ही माहिती देण्यात आली होती.