Live in Relationship मध्ये राहणाऱ्या तरुणीची इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या
फोटो सौजन्य- फाइल इमेज

पुण्यामध्ये Live in Relationship मध्ये राहणाऱ्या जोडप्यातील तरुणीने इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या तरुणीच्या प्रियकराचे दुसरे लग्न ठरल्याने त्याने तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिल्याने तरुणीने हे पाऊल उचलले आहे.

पिंपरी चिंचवड येथे राहणाऱ्या तरुणीचे आयटी कंपनीत काम करत असलेल्या योगेश सोनावणे याच्या सोबत प्रेमसंबंध जुळले होते. तसेच योगेश हा तिच्यासोबत गेले काही दिवस live in मध्ये राहत होता. मात्र अचानक घरातील मंडळींनी योगेशचे लग्न दुसऱ्या मुलीसोबत ठरविल्याने त्याने live in मध्ये राहणाऱ्या तरुणीला लग्न करण्यास नकार दिला. या प्रकरणी तरुणीने योगेशच्या पाठी तिच्या सोबत लग्न करण्यासाठी गळ घालण्यास सुरुवात केली. मात्र योगेशने अखेर नकार दिल्याच्या नैराश्याने तिने राहत्या घराच्या इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे.

या तरुणीच्या आत्महत्येचा सर्व प्रकार इमारतीमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तर तरुणीच्या मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला आहे.