गुजरात: अहमदनगर जिल्ह्यातील 4 भाविकांवर काळाचा घाला; देवदर्शन घेऊन परतत असताना झाला भीषण अपघात
अहमदनगर जिल्ह्यातील 4 भाविकांवर रविवारी काळाने घाला घातला आहे. देवदर्शन घेऊन परतत असताना गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात रस्ते अपघातात या भाविकांच्या कारला अपघात झाला. कारने रस्त्यावर उभा असलेल्या ट्रकला धडक दिली. यात कारमधील भाविकांचा मृत्यू झाला. नंदकिशोर संपत, किशोर कोल्हे, गोरख घोरपडे आणि प्रवीण शिरसाठ, अशी अपघात मृत झालेल्या भाविकांची नावे आहेत. विशेष या अपघातात मृत्यू झालेले चौघेही एकमेकांचे नातेवाईक आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar District) 4 भाविकांवर रविवारी काळाने घाला घातला आहे. देवदर्शन घेऊन परतत असताना गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात (Narmada District) रस्ते अपघातात या भाविकांच्या कारला अपघात (Accident) झाला. कारने रस्त्यावर उभा असलेल्या ट्रकला धडक दिली. यात कारमधील भाविकांचा मृत्यू झाला. नंदकिशोर संपत, किशोर कोल्हे, गोरख घोरपडे आणि प्रवीण शिरसाठ, अशी अपघात मृत झालेल्या भाविकांची नावे आहेत. विशेष या अपघातात मृत्यू झालेले चौघेही एकमेकांचे नातेवाईक आहेत.
या अपघाताची माहिती मिळताचं तेथील स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्याला सुरुवात केली. या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 2 जणांचा गुजरातमधील राजपिपला सिव्हिल रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. (हेही वाचा - Maharashtra Budget session 2020: शेतकऱ्यांच्या फसवणुकीची मालिका कर्जमाफीच्या माध्यमातून सुरु: देवेंद्र फडणवीस)
अपघातग्रस्त कारमधील भाविक शनिवारी दुपारी निर्मळ येथून इर्टीका कारने गुजरातमधील कुबेर देवस्थानाचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. दरम्यान, दर्शन घेऊन परतत असताना नर्मदा शहराजवळ कार व ट्रकची धडक झाली. हा अपघात येवढा भीषण होता की, यात कारमधील चारही जणांचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताचं स्थानिकांनी एकच गर्दी केली. गुजरातमधील नर्मदा पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अपघातात मृत्यू पावलेल्या भाविकांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Feb 24, 2020 11:25 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

