Dr. Payal Tadvi Suicide Case: पायल तडवी आत्महत्या प्रकरणी आरोपींना तूर्तास जामीन नाही, मुंबई हायकोर्टाची सुनावणी पुढील आठवड्यात

मुंबई उच्च न्यायालय (Photo Credit : ANI)

मुंबई:  नायर रुग्णालयात (Nair Hospital) 22 मे रोजी रहिवाशी शिकाऊ डॉक्टर पायल तडवी (Dr. Payal Tadvi) हिच्या आत्महत्येनंतर राज्यभरात खळबळ माजली होती. हॉस्पिटलमधील सिनियर महिला डॉक्टर्सकडून जातीय भेदभाव केला जात असून सतत टोमणे ऐकावे लागत असल्याने पायलने गळफास घेतआपले जीवन संपवले. या प्रकरणी आरोपी भक्ती मेहेर (Bhakti Mehre), डॉ हेमा अहुजा (Hema Ahuja) आणि डॉ अंकिता खंडेलवाल (Ankita Khandelwal) या तीन सिनियर डॉक्टर्संना अटक करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी या डॉक्टरांनी मुंबई हायकोर्टात (Bombay High Court)  केलेल्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार होती. सूत्रांच्या माहितीनुसार ही तारीख एक आठवडा पुढे ढकलण्यात आली आहे.

ANI ट्विट

यापूर्वी पोलिसांच्या तपासात पायल तडवीने लिहिलेली सुसाईट नोट 3 आरोपींनी नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे सिद्ध झाले आहे. या सुसाईट नोटचा स्क्रिनशॉट फोनमधून रिकव्हर करण्यात फॉरेंसिक विभागाला यश आल्याची माहिती वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दिली होती.  Payal Tadvi Suicide Case: नायर हॉस्पिटलमधील कथित रॅगिंग आणि आत्महत्या प्रकरणातीन तिन्ही सिनियर डॉक्टरांच्या जामीन अर्जाच्या सुनावणीचं होणार व्हिडिओ रेकॉर्डिंग

दरम्यान, याआधी सुद्धा विशेष एससी- एसटी कोर्टाने यापूर्वी सुद्धा डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील तीन आरोपी डॉक्टरांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता.यावर पायलच्या कुटुंबाने नायर हॉस्पिटलची मान्यता रद्द करावी व या तीनही डॉक्टरांचे परवाने जप्त करावे अशी संतापजनक प्रतिक्रिया दिली होती. तूर्तास या प्रकरणात पुढे काय वळण येतेय हे पाहण्यासाठी तडवी कुटुंबाला आणखीन एक आठवडा वाट पाहावी लागणार हे निश्चित.