Promotion Examination Of ST Corporation: एसटी महामंडळाच्या रिक्त पदांसाठीची खात्यांतर्गत बढती परीक्षा विनाअडथळा पार
सरकार संप संपवण्यासाठी पुर्ण प्रयत्नशील आहे. मात्र कर्मचारी विलनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम असल्याचे दिसून येत आहे. यातच एसटी महामंडळाच्या सुमारे 681 रिक्त पदांसाठीची खात्यांतर्गत बढती परीक्षा सुरळीत पार पडली आहे.
राज्यात एसटी महामंडळाच्या (ST) कर्मचाऱ्यांचा संप (ST Strike) संपत नसल्याचे चित्र आहे. सरकार संप संपवण्यासाठी पुर्ण प्रयत्नशील आहे. मात्र कर्मचारी विलनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम असल्याचे दिसून येत आहे. यातच एसटी महामंडळाच्या सुमारे 681 रिक्त पदांसाठीची खात्यांतर्गत बढती परीक्षा सुरळीत पार पडली आहे. याआधी एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Employee) मार्फत सदर परीक्षा रद्द करण्यात यावी, अशी मागणी न्यायालयात करण्यात आली होती. परंतू परीक्षा रद्द करण्यास न्यायालयाने स्पष्ट नकार दर्शवला होता. याउलट ज्या संपकरी कर्मचाऱ्यांना बढती परीक्षेला बसायचे आहे. त्यांनी रुजू अहवाल सादर करुन परीक्षेस उपस्थित रहावे असे आदेश दिले. हेही वाचा Sanjay Raut Statement: देशात 'मुक्त आणि न्याय्य' काहीही शिल्लक राहिलेले नाही, म्हणत संजय राऊतांची केंद्रावर टीका
यानंतर रविवारी राज्यभरात तब्बल 28 केंद्रांवर एकाच वेळी ही परीक्षा घेण्यात आली. एसटी महामंडळाच्या वाहतूक नियंत्रक, सहाय्यक वाहतूक निरीक्षक, वरिष्ठ लिपिक अशा विविध पदांसाठी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला सुमारे 681 जागांसाठीच्या पदांसाठी 4 हजार उमेदवारांना पात्र करण्यात आले होते. त्यापैकी परीक्षेला प्रत्यक्ष 1 हजार 464 इतके कर्मचारी उमेदवार उपस्थित होते. या परीक्षेचा निकाल लवकर जाहीर करण्यात येईल, असे एसटी प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.