IPL Auction 2025 Live

Aaditya Thackeray On EVM: गद्दार उमेदवार आता लोकशाहीशी गद्दारी करत आहे; आदित्य ठाकरेंची टिका

आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, एकदा गद्दार तो गद्दार! उत्तर-पश्चिम मुंबईतील मिंधे टोळीच्या उमेदवाराचे प्रकरण गंभीर बनले आहे, कारण गद्दार उमेदवार आता लोकशाहीशी गद्दारी करत आहे.

Aaditya Thackeray | (Photo Credit - Twitter)

मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर अवघ्या 48 मतांनी विजयी झाल्यानंतर सुरू असलेला वाद अजूनही कायम आहे. आता या प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. ईव्हीएम अनलॉक करणारा मोबाईल हा रवींद्र वायकर यांच्या मेव्हण्याच्या हाती असल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. या प्रकरणात वनराई  पोलिसांकडून तपास सुरु आहे. शिंदे गटाचे लोक ईव्हीएम उघडण्याचं अॅप असलेला मोबाईल घेऊन मतदान केंद्रावर गेल्याचा आरोपही आदित्य ठाकरेंनी केलाय. या विरोधात कोर्टात जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.  ( Rahul Gandhi On EVMs in India: 'भारतात EVMs जणू 'Black Box'; कोणालाही छाननी ची परवानगी नाही, मुंबई मधील Ravindra Waikar यांच्या प्रकारणावरून राहुल गांधी पुन्हा गरजले!)

आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, एकदा गद्दार तो गद्दार! उत्तर-पश्चिम मुंबईतील मिंधे टोळीच्या उमेदवाराचे प्रकरण गंभीर बनले आहे, कारण गद्दार उमेदवार आता लोकशाहीशी गद्दारी करत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, संपूर्ण तडजोड- निवडणूक आयोगाने मतमोजणी केंद्राचे सीसीटीव्ही फुटेज शेअर करण्यास नकार दिला आहे. माझा अंदाज आहे की तो आणखी एक चंदिगडचा क्षण टाळण्याचा प्रयत्न करत आहे.

पाहा आदित्य ठाकरेंची पोस्ट -

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत ईव्हीएम म्हणजे ब्लॅक बॉक्स असल्याचं म्हटलं आहे. जर प्रक्रियाच पारदर्शकपणे राबवली गेली नसेल तर लोकशाही ही लबाडी बनते असा आरोप त्यांनी मस्क यांच्या ट्विटला रिप्लाय देताना केला आहे. त्यांनी रवींद्र वायकर प्रकरणाचा संदर्भ दिला आहे.