Lok Sabha Security Breach: संसदेतील घुसखोर तरुण 'Bhagat Singh Fan Club' सोशल मीडिया पेजशी संबंधीत
सागर शर्मा (Sagar Sharma) नावाचा एक संशयित आरोपी 'भगतसिंग फॅन क्लब' (Bhagat Singh Fan Club) सोशल मीडिया पेजशी संबंधित आहेत. हे सर्वजण साधारण दीड वर्षांपूर्वी म्हैसूर येथे एकत्र आले होते. या प्रकरणात मुख्य संशयीत असलेला सागर शर्मा, लखनौचा रहिवासी आहे.
संसद सुरक्षा भंग प्रकरणी पोलीस अधिकारी चौकशी करत आहेत. या चौकशीदरम्यान अनेक महत्त्वाचे तपशील पुढे येत आहेत. त्याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर शर्मा (Sagar Sharma) नावाचा एक संशयित आरोपी 'भगतसिंग फॅन क्लब' (Bhagat Singh Fan Club) सोशल मीडिया पेजशी संबंधित आहेत. हे सर्वजण साधारण दीड वर्षांपूर्वी म्हैसूर येथे एकत्र आले होते. या प्रकरणात मुख्य संशयीत असलेला सागर शर्मा, लखनौचा रहिवासी आहे. तो जुलैमध्ये लखनऊहून आला होता. आगोदच ठरल्याप्रमाणे हे सर्वजण 10 डिसेंबर रोजी दिल्ली येथे जमले. हे सर्वजण इंडिया गेटजवळ एकत्र आले. जेथे त्यांनी रंगीत फटाके आणि धूर सोडणारी साधणे वाटून घेतली. या सर्वांपाठीमागे एक मुख्य सूत्रधार आहे. मात्र, त्याचे नाव पुढे येऊ शकले नाही. प्रकरणातील एक संशयीत सागर हा जुलै महिन्यातच लखनऊ येथून दिल्लीला आला होता. मात्र, त्याला संसदेत जाता आले नव्हते.
सागर डाव्या विचारसरणीने प्रेरित
दरम्यान, हल्ल्यातील संशयित सागर शर्मा हा लखनौच्या माणकनगर भागातील रहिवासी असून, डाव्या विचारसरणीने प्रेरित असल्याचे त्याच्या फेसबुकवरील कृती आणि पोस्ट यांवरुन पुढे येत आहे. त्याची दोन फेसबुक खाती अनेक महिन्यांपासून निष्क्रिय असूनही, त्याच्या सोशल मीडिया पृष्ठांवर कोलकाता, राजस्थान आणि हरियाणातील व्यक्तींशी असलेले संबंध उघड झाले आहेत. सागरचे कुटुंब उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील आहे.परंतु ते लखनौमध्ये जवळपास दोन दशकांपासून वास्तव्य करत आहेत, असे तपासात पुढे आले आहे. (हेही वाचा, Parliament Security Breach Updates: संसद सुरक्षा भंग प्रकरणी सात कर्मचारी निलंबीत)
लोकसभेच्या चेंबरमध्ये प्रवेश
2001 च्या संसदेवरील दहशतवादी हल्ल्याच्या वर्धापनदिनानिमित्त, सागर शर्मा आणि त्याच्या आणखी एका साथीदाराने संसद सुरक्षेचा भंग केला. त्यांनी संगनमताने लोकसभेच्या चेंबरमध्ये प्रवेश केला आणि पिवळा गॅस सोडला. ही घटना घडली तेव्हा शून्य प्रहर सुरु होता. या वेळी त्याने प्रेक्षागृहातून सभागृहात उडी घेतली आणि घोषणाबाजी सुरु केली. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने बेकायदेशीर कृती (प्रतिबंध) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गृह मंत्रालयाने या घटनेची चौकशी सुरू केली आहे. (हेही वाचा, Lok Sabha Security Breach: संसदेतील घुसखोराला खासदारांनी केली मारहाण; समोर आला व्हिडिओ (Watch))
आरोपी एकमेकांच्या संपर्कात
दरम्यान, प्राप्त माहितीनुसार, पोलीस तपासात पुढे आले आहे की, चारही आरोपी पाठमागील जवळपास दोन ते अडीच वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात आहेत. हे सर्व आरोपी सरकारचे बेरजगारी, महागाई याकडे लक्ष वेधण्यासाठी काहीतरी मोठ्या प्रमाणावर करायचे याचा विचार करत होते. त्यातून त्याच्या अनेक बैठका पार पडल्या होत्या. तसेच, त्यांनी त्यासाठी निश्चित कटही आखला होता. त्यातूनच त्यांनी हे कृत्य केल्याचे प्राथमिक माहितीमध्ये पुढे आले आहे. दरम्यान, पोलीस तपास अद्यापही सुरुच आहे. त्यामुळे तपास जजजसा गती घेईल तसतशी अधिक माहिती पुढे येण्याची शक्यता आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान दोन तरुणांनी लोकसभा सभागृहात केलेली घुसखोरी आणि सुरक्षा व्यवस्थेत झालेली गंभीर चूक (Lok Sabha Security Breach) केंद्र सरकारने गांभीर्याने घेतली आहे. या प्रकरणात झालेल्या पहिल्या कारवाईमध्ये संसदेच्या सात कर्मचाऱ्यांना निलंबीत केले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)