महिलेचा शरीरसुखासाठी तगादा ; परभणीत तरुणाची आत्महत्या

महिलेने शरीर सुखासाठी तगादा लावल्याने एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

सचिन मिटकरी (Photo Credit : Facebook)

महिलेने शरीर सुखासाठी तगादा लावल्याने एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सचिन मिटकरी असे या तरुणाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये महिलेने धमकी दिल्याचा उल्लेख केला आहे.

सचिन मिटकरी हा तरुण परभणीतील वसमत रोड येथील दत्त धाम येथे राहतो. सचिनने गळफास घेत आत्महत्या केली आहे. सुसाईड नोटमध्ये त्याने महिलेच्या नावाचा उल्लेख केला आहे. सुसाईड नोटमध्ये सचिनने लिहिले की, "त्या महिलेने माझे आयुष्य उद्धवस्त केले आहे. माझे लग्न झाले आहे हे माहित असूनही ती माझ्याकडे शरीरसुखाची मागणी करत होती." इतकंच नाही तर शरीरसंबंध न ठेवल्यास बदनाम करेन अशी धमकी ती त्याला देत होती. त्या महिलेचे आणखी दोन पुरुषांसोबत संबंध असून तिने माझ्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला होता आणि त्यालाच कंटाळून मी आत्महत्या करत असल्याचे त्याने सुसाईट नोटमध्ये म्हटले आहे.

या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement