IPL Auction 2025 Live

झुरळांमुळे थांबली Panvel Nanded Express ट्रेन (Watch Video)

ही घटना शनिवार दिनांक 5 ऑगस्ट 2023 रोजी पुणे स्थानकावर सायंकाळी साडे सातच्या सुमारास घडली.

Indian Railways | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

'झुरळांमुळे थांबली ट्रेन' हे शिर्षक वाचून अनेकांना काहीशी गंमत वाटली असेल. असे कधी होऊ शकते का? उन, वारा, पाऊस याची तमा नग बाळगता सतत धावणारी ट्रेन झुरळ कधी आढवू शकेल? असा प्रश्न सहाजिकच अनेकांच्या मनात निर्माण झाला असेल. पण असे घडले आहे खरे. मुंबईहून नांदेडच्या दिशेने निघालेली 'पनवेल-नांदेड एक्स्प्रेस' (Panvel Nanded Express train) प्रवाशांनी पुणे स्थानकावर रोखून धरली. कारण ठरली झुरळे. होय, ट्रेनच्या एसी कोचमध्ये धुरळांनी अक्षरश: उच्छाद मांडला होता. झुरळांची संख्या पाहून अक्षरश: किळस यावी अशी स्थिती होती. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

झुरळ असलेल्या ट्रेनच्या कोचमधून प्रवास करायचा तरी कसा आणि तोही का म्हणून? असा सवाल विचारत प्रवाशांनी संताप व्यक्त केला आणि ट्रेन रोखून धरली. ही घटना शनिवार दिनांक 5 ऑगस्ट 2023 रोजी पुणे स्थानकावर सायंकाळी साडे सातच्या सुमारास घडली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने हजेरी लावत प्रवाशांची समजूत घातली आणि झुरळांना हाकलले मग गाडी पुढे निघाली. (हेही वाचा, Bharat Gaurav Train: पुणे येथून 22 जून रोजी सुरु होणार नवी भारत गौरव ट्रेन; घडणार उत्तर भारतातील लोकप्रिय ठिकाणांचे दर्शन, जाणून घ्या सविस्तर)

रेल्वेडब्यांमध्ये स्वच्छतेचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर असतो. रेल्वेतील स्वच्छतेबाबत अनेक प्रवासी नेहमी तक्रारी करत असतात. प्रवाशांच्या या संतापाचा कडेलोट पुणे स्थानकावर पाहायला मिळाला. सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास पनवेल- नांदेड एक्स्प्रेस पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचली. प्रवासी संतप्त होते आणि अत्यंत रागाने ते रेल्वे प्रशासनाला लाखोली वाहात होते. कोचमध्ये असलेली झुरळं या संतापाचे कारण होते. त्यांनी ट्रेनच रोखून धरली आणि झुरळे हाकलण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. यामुळे ही ट्रेन फलाट क्रमांक एकवर तब्बल एक तास थांबली होती.

ट्विट

प्रवाशांनी झुरळांचे चित्रीकरण करुन हा व्हिडओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल केला. त्यानंतर धावपळ करत रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रवाशांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण, प्रवासी इतके संतापले होते की त्यांनी अधिकाऱ्यांकडे लेखी मागितले. अधिकाऱ्यांनी पुढच्या स्थानकात डबा बदलून देण्याचे किंवा पेस्ट कंट्रोल करण्याचे अश्वासन दिले. तसेच, एक इंजिनिअर आणि स्वच्छता कर्मचाऱ्यासह ट्रेन पुढे रवाना झाली.