Panchganga River Water Level Increase : पंचगंगा नदीच्या पाणीपातळी मोठी वाढ; अनेक बंधारे पाण्याखाली (Watch Video)
नदीची पाणीपातळी 30 फुटांवर पोहचली आहे. पंचगंगेसह अनेक नद्या पात्राबाहेरून वाहू लागलेल्या आहेत.
Panchganga River Water Level Increase : सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे राज्यातील धरणांत पाणीसाठा वाढत आहे. नदी-नाले तुडूंब भरून वाहत आहेत. राज्यात दरवर्षी कोकण विभागासह कोल्हापूर मधे सर्वाधीक पावसाची नोंद होते. त्यात आता मान्सून सुरू होऊन काही दिवस उलटले नाही तोच दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने कोल्हापूरला झोडपून काढलं आहे. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंचगंगा नदीची पाणीपातळी 30 फुटांवर पोहचली आहे. कोल्हापुरातील जवळपास 52 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
त्यामुळे पावसाळा सुरू होताच पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठल्याने सर्वांना आशर्च्य व्यक्त केले आहे. अनेक पर्यटक तेथे दाखल होत आहेत. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट असून धोक्याची पाणीपातळी 42 फूट इतकी आहे. त्यामुळे जिल्ह्यात असाच पाऊस सुरू असला, तर कोल्हापुरात पूरस्थिती निर्माण होऊ शकते. हीच बाब लक्षात घेता प्रशासन सतर्क झाले आहे.
पहा व्हिडीओ
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगेसह अनेक नद्या पात्राबाहेरून वाहू लागलेल्या आहेत.