Onion Price Update: कांदा रडवणार! नाशिकमधील लासलगाव मंडीत कांद्याच्या किंमतीत गेल्या 2 दिवसांत प्रति क्विंटल 970 रुपयांची वाढ; जाणून घ्या किलोमागील दर

तर खरीप जातीसाठी प्रति क्विंटल 3,870 रुपये किंमत नोंदविण्यात आली.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

Onion Price Update: कांदा पुन्हा एकदा सर्वसामान्यांना रडवणार आहे. आशियातील सर्वात मोठी कांदा बाजार, नाशिक जवळील लासलगाव मंडीमध्ये (Lasalgaon Market) कृषी उत्पन्न बाजार समितीत (एपीएमसी) कांद्याची सरासरी घाऊक किंमत गेल्या 2 दिवसांत प्रति क्विंटल 970 रुपयांनी वाढून 4200-4500 रुपये प्रतिक्विंटल झाली आहे. नाशिकमधील लासलगाव येथून देशभर कांदा पाठविला जातो.

गेल्या काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे कांद्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे घाऊक बाजारात कांद्याची आवक कमी झाली. कांदा महाग होण्याचे हे सर्वात महत्वाचे कारण असल्याचे म्हटलं जात आहे. (वाचा - New Coronavirus Strain in Satara: सातारा जिल्ह्यात कोरोनाची नवी प्रजाती; जिल्ह्यामधील अनेक तालुक्यातील ठिकाण हॉटस्पॉट म्हणून जाहीर)

माध्यमांच्या वृत्तानुसार, शनिवारी लासलगावात कांद्याची सरासरी किंमत 4250-4,551 रुपये प्रति क्विंटल होती. तर खरीप जातीसाठी प्रति क्विंटल 3,870 रुपये किंमत नोंदविण्यात आले. व्यापाऱ्यांच्या मते पावसामुळे कांद्याच्या भावात वाढ झाली आहे. शनिवारी 20 फेब्रुवारीला लासलगाव मंडीमध्ये कांद्याचा दर प्रतिक्विंटल 3,500 - 4,500 रुपये इतका होता. कांदा येत्या काही दिवसांत अधिक महाग होण्याची शक्यता आहे. (वाचा -

नवीन कृषी कायद्याबाबत शेतकरी देशभर आंदोलन करीत असताना कांद्याचे दर वाढत आहेत. या नवीन कृषी कायद्यांमध्ये संसदेत जीवनावश्यक वस्तू कायद्यात सुधारणा करण्यात आली. बटाटे, कांदे, मसूर, तांदूळ, खाद्यतेल तेलबिया यासारख्या वस्तू गेल्या वर्षी आवश्यक वस्तू अधिनियम 1955 च्या कार्यक्षेत्रातून काढून टाकल्या आहेत. याचा अर्थ स्टॉकची मर्यादा आता काढली गेली आहे. या वस्तू अधिक साठवण्यासाठी आता कोणतीही कारवाई होणार नाही. कंपन्या किंवा कोणतेही व्यापारी या वस्तू कोणत्याही प्रमाणात साठवण्यास स्वतंत्र असतील.